धक्कादायक; सोलापुरात सिक्युरिटी गार्डने केली आत्महत्या; मित्र नगरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2022 16:46 IST2022-05-24T16:41:52+5:302022-05-24T16:46:38+5:30
सोलापुरातील घटना; पोलिस घटनास्थळी दाखल

धक्कादायक; सोलापुरात सिक्युरिटी गार्डने केली आत्महत्या; मित्र नगरातील घटना
सोलापूर : मित्र नगर शेळगी परिसरात राहणारे दिपक गंगाधर पवार (वय अंदाजे ३६) या सिक्युरिटी गार्डने अज्ञात कारणावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास समोर आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, दीपक गंगाधर पवार याने आपल्या राहत्या घरात मित्र नगर शेळगी येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे\ आजूबाजूच्या परिसरामध्ये वास येत असल्यामुळे ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोलीस दाखल झालेले असून मयत दिपकचा मृतदेह शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.