धक्कादायक; सारिका कसबे यांचे निधन; सायंकाळी सोलापुरात होणार अंत्यसंस्कार

By Appasaheb.patil | Updated: June 8, 2023 15:00 IST2023-06-08T15:00:04+5:302023-06-08T15:00:17+5:30

सोलापूर : शहरातील डी. के. मागासवर्गीय संस्थेचे प्रमुख दशरथ कसबे यांच्या पत्नी सारिका दशरथ कसबे याचे वयाच्या ३७ व्या ...

Shocking; Sarika Kasbe passed away; The funeral will be held in Solapur in the evening | धक्कादायक; सारिका कसबे यांचे निधन; सायंकाळी सोलापुरात होणार अंत्यसंस्कार

धक्कादायक; सारिका कसबे यांचे निधन; सायंकाळी सोलापुरात होणार अंत्यसंस्कार

सोलापूर : शहरातील डी. के. मागासवर्गीय संस्थेचे प्रमुख दशरथ कसबे यांच्या पत्नी सारिका दशरथ कसबे याचे वयाच्या ३७ व्या वर्षी निधन झाले. दरम्यान, आज सकाळी शासकीय रूग्णालयातील पाच डॉक्टरांच्या पथकाने सारिका कसबे याच्या पार्थिवाची उत्तरीय तपासणी केली असून आता त्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, सारिका दशरथ कसबे यांना ५ जून २०२३ रोजी पोटात त्रास होऊ लागल्याने सोलापुरातल्या खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे त्याच्यावर ७ जून २०२३ रोजी शस्त्रक्रियाही करण्यात आली. यानंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही. पोटात रक्तस्त्राव होतच होता असे निकटच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे.

शासकीय रूग्णालयात आज सकाळी पार्थिवाची तपासणी झाल्यानंतर मृतदेह दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सारिका यांच्या निधनाचे वृत्त कळताच शहरातील लोकप्रतिनिधी, मित्र परिवारांनी शासकीय रूग्णालयात मोठी गर्दी केली होती.  त्यांच्यावर सायंकाळी ६ वाजता रूपाभवानी नजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सारिका याच्या पश्चात पती, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Shocking; Sarika Kasbe passed away; The funeral will be held in Solapur in the evening