शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; प्रेत बाजूला ठेवून काढले घरात शिरलेले पावसाचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 14:02 IST

कल्याणनगरमधील प्रकार ; प्रत्येक पावसात हीच परिस्थिती

सोलापूर : घरातील कर्ता पुरूष सोडून गेला, या दु:खात माडेकर कुटुंबीय होते़ रविवारी मध्यरात्रीपासून ते सोमवारी सकाळी ९ पर्यंत मुसळधार पाऊस होता़ रात्री झालेल्या पावसामुळे घरात पाणी शिरले़ यामुळे कर्ता पुरूष गेल्याच्या दु:खापेक्षा घरातील पाणी काढत कुटुंबीयांना आपल्या दु:खाला वाट करून द्यावी लागली.

हणुमंतू हुसेनप्पा माडेकर (वय ४७, रा. कल्याणनगर - ३, जुळे सोलापूर ) यांना शनिवारी सकाळी अचानक त्रास होऊ लागल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले़ पण सायंकाळी त्यांच्या निधनाची बातमी आली़ यामुळे माडेकर कुुटुंबीयांवर शोककळा पसरली़ अचानक घरातील कर्त्या पुरूषाचे निधन झाल्यामुळे माडेकर कुुटुंबीयांवर दु:खाचा डोंंगर कोसळला.

 या दु:खातच सर्व कुुटुंबीय होते़ पण रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे माडेकर यांच्या घरात पाणी शिरले. यामुळे कुुटुंबीयांना आपल्या अश्रूंना आवर घालत रविवारी आपल्या घरात आलेले पाणी बाहेर काढत रात्र घालवावी लागली. माडेकर कुुटुंबीय दु:खात असताना शेजारीपाजाºयांनी त्यांच्या घरातील पाणी काढण्यासाठी मदत केली़ रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे घरातील लहान मुलांनाही रात्र पूर्ण जागून काढावी लागली.

घरात दोन मोटार लावून पाणी उपसा- रविवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे माडेकर यांच्यासह कल्याणनगर भाग दोनमधील अनेक घरांमध्ये पाणी घुसले़ घरातील पाणी माडेकर कुुटुंबीय हे बकेटच्या सहाय्याने काढत होते़ पण तरीही पाणी संपत नसल्यामुळे पाणी ओढणाºया मोटारची मदत घ्यावी लागली़ पाणी काढण्यासाठी दोन मोटार लावण्यात आले़ या मोटारने पाणी काढण्याचे काम सोमवारी सकाळी दहापर्यंत सुरू होते़ 

रात्रभर पाऊस आल्यामुळे घरात पाणी शिरले़ आमच्या काकाने कष्ट करून बांधलेल्या घरातही त्यांना शेवटची रात्र काढता आली नाही़ याचे जास्त वाईट वाटते़ एकीकडे आमच्या घरातील कर्ता पुरूष गेला या दु:खात होतो़ रात्रभर आम्हाला घरात शिरलेले पाणी काढत बसावे लागले़ - सिध्दाराम माडेकर 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसwater shortageपाणीकपातDeathमृत्यू