शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; ड्युटीवर असलेल्या महिला पोलिसाची मोटरसायकल भर चौकातून गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 08:45 IST

चोरट्याने दिले थेट पोलिसालाच आव्हान; सोलापूर शहरातील घटना

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला पोलिसाची मोटारसायकल अज्ञात चाेरट्याने चोरून नेली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, चोरट्याने थेट पोलिसाला आव्हान दिले आहे. हा प्रकार गुरुवारी भर दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास घडला.

महिला पोलीस कॉन्स्टेबल विद्या रामचंद्र वाणी (वय ३४, रा. केशव नगर पोलीस लाइन, सोलापूर) यांना छत्रपती शिवाजी महाराज चौकात ड्युटी दिली होती. सकाळी ८ वाजता त्या ड्युटीवर आल्या. त्यांनी आपली मोटारसायकल चौकातील एका दुकानासमोर लावली व रस्त्याच्या कडेला थांबून कामाला सुरुवात केली. शंका आलेल्या वाहनांना अडवून नेहमीप्रमाणे कारवाईला सुरुवात केली. कारवाई करत करत त्या इतरत्र फिरून पुन्हा आपली गाडी लावलेल्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आल्या तेव्हा त्यांना त्यांची मोटारसायकल (क्र.इमचएच १३ बीपी १४२६) जागेवर नसल्याचे आढळून आले. आजूबाजूला चाैकशी केली असता त्यांना गाडीची माहिती नसल्याचे सांगण्यात आले. बराच वेळ झाला तरी गाडी मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर आपली ६० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली. तपास पोलीस नाईक विठ्ठल पैकेकरी करीत आहेत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

  • ० चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्यात एक रुमाल लावलेला तरुण मोटारसायकल घेऊन जात असताना दिसत आहे. मात्र तोंडाला रुमाल लावल्याने तो नेमका कसा दिसतो हे समजून येत नाही. शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे, मात्र थेट महिला पोलीस कर्मचाऱ्याची मोटारसायकल चोरून पोलिसांना अव्हान दिले आहे.
  • ० भरदिवसा गजबजलेल्या चौकातून एका पोलीस कर्मचाऱ्याची मोटारसायकल चोरून नेल्याप्रकरणी खळबळ उडाली आहे. जिथे पोलिसांच्या गाड्या सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्यांच्या गाड्यांचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसThiefचोरPoliceपोलिस