शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; क्षणात मुंडके झाले धडावेगळे; अन् धान्याची रास माखली रक्तानं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 09:50 IST

माढा तालुक्यातील घटना; बुद्रुखवाडीतील ग्रामस्थ शोकात

माढा : पोटाची खळगी भरण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात कामाला गेलेल्या विमल विलास आतकरे वय (४८) यांचा सोयाबीनची मळणी सुरू असताना मळणी यंत्रात केस व पदर अडकल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची  हृदयद्रावक घटना शुक्रवार 2 रोजी दुपारी एकच्या सुमारास माढा तालुक्यातील बुद्रुकवाडी येथे घडली आहे.

यावर्षी पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून यामुळे उडीद सोयाबीन मका ही पिके मोठ्या प्रमाणात जोमाने आले आहेत. अचानक होणाऱ्या  पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी  ट्रॅक्टरच्या मळणी यंत्राद्वारे धान शेतकरी करण्यास प्राधान्य देतात. तर  बुद्रुकवाडी येथील विष्णू  दळवी यांच्या शेतामध्ये सोयाबीनच्या  मळणी साठी बाळासाहेब उदगे यांचे मळणी यंत्र शेतात सुरू झाले थोडीफार रास झाली यंत्रात सोयाबीन टाकण्याचे काम सुरू असताना याठिकाणी विमल आतकरे यांच्या सह चार महिला व दोन पुरुष मळणीचे काम करीत होते. यावेळी विमल आतकरे या मळणी यंत्रात सोयाबीन टाकण्याचे काम करत असताना त्यांचे अचानक केस आणि पदर मळणी यंत्राच्या सॉफ्टमध्ये अडकल्याने चालू असलेल्या मळणी यंत्राने  त्यांना खेचून घेतले.

मळणी यंत्र बंद करेपर्यंत  त्यांच्या  डोक्याचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  यावेळी  सोयाबीनच्या खळ्यावर रक्ताचा सडा पडला होता. त्यांच्या पश्चात पती दोन मुले दोन मुली सासू-सासरा असा मोठा परिवार आहे.

खळ्यात रक्ताचा सडा...या अनुसूचित घटनेने मयत विमल यांना ओरडत आहे आले नाही आणि क्षणात मुंडके आणि धड वेगळे झाल्याने रक्ताच्या चिळकांड्या वरून खळ्यात रक्ताचा सडा पडला होता. बुद्रुकवाडी येथे समर्थ रामदास दासबोध बैठकीसाठी त्यांनी योगदान दिले होते तर वारकरी संप्रदायाच्या विचाराच्या अनुयायी  असल्याने त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच गावात शोकाकुल वातावरण झाले होते.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-acमाढाAccidentअपघातFarmerशेतकरीagricultureशेती