धक्कादायक; पंढरपूर सबजेलमध्ये बंदी असलेल्या चौघांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 18:52 IST2020-08-28T18:42:20+5:302020-08-28T18:52:43+5:30
पंढरपूर कोरोना अपडेट; नैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी बंदी होते कैदी

धक्कादायक; पंढरपूर सबजेलमध्ये बंदी असलेल्या चौघांना कोरोनाची लागण
पंढरपूर : अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने पंढरपूर तहसील कार्यालयातील सबजेलमध्ये बंदी असलेल्या एकाला कोरानाची लागण झाली आहे. तसेच विविध गुन्ह्यात बंदी असलेल्या इतर तिघांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
पंढरपूर तहसील कार्यालयातील सबजेल मध्ये ५० बंदी आहेत. त्यापैकी पाच जणांना सर्दी ताप व अन्य त्रास होऊ लागला. त्यामुळे यांना उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले. त्यांची त्याठिकाणी कोरोनाबाबत चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एकाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला तर इतर चौघे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे त्या चौघांवर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. तर इतर ४५ जणांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पंढरपूर तहसील कार्यालयातील जेलर भागवत तुकाराम फंड व पी. टी. शिंदे यांनी सांगितले.