शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

धक्कादायक; पंधरा हजारांसाठी सोलापूरच्या तरुणाला ११ मजल्यावरून फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 11:48 IST

पुण्यातील कोंढवा भागातील घटना; तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा

ठळक मुद्देकोंढवा भागातील खडी मशिन चौकात कुल उत्सव ही ११ मजली इमारतया सोसायटीच्या ११ व्या मजल्यावर अभिनव व त्याचे मित्र राहतातपैसे परत केले नव्हते़ यावरून त्यांच्यात सोमवारी रात्री भांडणे

पुणे : व्याजाने घेतलेले १५ हजार रुपये पैसे परत करण्याच्या वादातून झालेल्या झटापटीत तरुणाला इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून खाली ढकलून देऊन खून केल्याचा प्रकार समोर आला आहे़.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा भागातील खडी मशिन चौकात कुल उत्सव ही ११ मजली इमारत आहे़ या सोसायटीच्या ११ व्या मजल्यावर अभिनव व त्याचे मित्र राहतात़ गेल्या १ मार्चपासून सागरही त्यांच्याबरोबर रहायला आला होता़ सागर याने त्यांच्याकडून ९ जानेवारी रोजी १० टक्के व्याजाने १५ हजार रुपये घेतले होते़ तीन महिने झाले तरी त्याने हे पैसे परत केले नव्हते़ यावरून त्यांच्यात सोमवारी रात्री भांडणे झाली़ त्यानंतर ते तिघे जण सागरला दुचाकीवरून घेऊन पहाटे पावणेदोन वाजता कुल उत्सव सोसायटीतील घरी नेले़ तेथील ११ व्या मजल्यावरील घरात गेल्यानंतर त्यांनी त्याला पुन्हा मारहाण करून ११ व्या मजल्यावरून ढकलून दिले़ आवाज ऐकून सोसायटीचा सुरक्षारक्षक ओंकार येनपुरे तिकडे धावत गेले़ त्यांनी पोलिसांना कळविले.

तीन वर्षांपासून तो पुण्यात राहात होतासागर चिलवेरी (वय २४, रा़ सोलापूर) असे त्याचे नाव आहे़ तो एका कंपनीत इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम करीत होता़ अभिनव जाधव, अक्षय गोरडे व तेजस गुजर (रा़ कुल उत्सव सोसायटी, खडीमशिन चौक, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ हे तिघे जण सिंहगड कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून तीन वर्षांपासून या सोसायटीमध्ये राहात आहेत़ ते मूळचे बीडचे आहेत़

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेEducationशिक्षण