धक्कादायक; पंढरपुरात कोरोनाने डॉक्टराचा मृत्यू; बळीची संख्या पोहचली २८ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 12:01 IST2020-08-14T11:55:58+5:302020-08-14T12:01:20+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

धक्कादायक; पंढरपुरात कोरोनाने डॉक्टराचा मृत्यू; बळीची संख्या पोहचली २८ वर
पंढरपूर : पंढरपुरातील कोरोना बधितांची संख्या मागील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणात वाढत असताना शुक्रवारी पंढरपुरातील एका खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टराचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे पंढरपुरातील बळींची संख्या आता २८ झाली आहे.
शुक्रवारी पहाटे एका डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. वैद्यकीय क्षेत्रात यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती, तथापि एका डॉक्टरावर मृत्यू ओढवण्याची दुर्दैवी घटना आज घडली.
मृत खासगी हॉस्पिटलमधील डॉक्टराना पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता ते तातडीने पुण्याला उपचारासाठी दाखल झाले होते. अखेर आज पहाटे नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मावळली. ग्रामीण भागातील एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांचा परिचय होता. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे.