शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
6
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
7
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
8
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
9
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
10
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
11
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
12
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
13
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
14
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
15
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
16
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
17
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
18
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
19
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
20
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...

धक्कादायक; लग्नपत्रिका वाटताना वधूपिता अपघातात ठार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 10:39 IST

वैराग-बार्शी रोडवरील घटना; मुलीच्या लग्नाला अवघे दोनच दिवस शिल्लक

ठळक मुद्दे- वैराग-बार्शी मार्गावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक- या अपघातात चार जण जखमी झाले- वधुपित्याच्या मृत्यूने वाळुज गावावर शोककळा

वैराग / वाळूज : मुलीची लग्नपत्रिका वाटप करून येताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. यामध्ये वधूपिता जागीच ठार झाले तर चुलते जखमी झाले़ ही घटना गुरुवारी दुपारी वैराग-बार्शी मार्गावर घडली़ रामचंद्र अश्वमेध मोटे (वय ४५, रा़ वाळूज, ता़ मोहोळ) असे ठार झालेल्या वधुपित्याचे तर सुरतीसेन मोटे असे जखमी चुलत्याचे नाव आहे.

वाळूज येथील रामचंद्र अश्वमेध मोटे यांची मुलगी योगिता हिचे ९ फेब्रुवारी रोजी लग्न आहे. लग्नाला अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने त्यामुळे रामचंद्र मोटे व त्यांचे बंधू सुरतीसेन मोटे यांनी दिवसभर लग्नपत्रिका वाटल्या़ त्यानंतर वैराग येथे किरकोळ बाजार करून ते गावाकडे जात होते.

 दरम्यान, त्यांची दुचाकी वैराग-बार्शी रोडवरील काळेगाव पाटी येथे आली असता समोरून आलेल्या दुचाकीशी समारोसमोर धडक झाली़ धडक इतक्या जोरात होती की, दोन्ही दुचाकींनी पेट घेतला. यामध्ये मुलीचे वडील ठार झाले व तिघेजण  गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताच्या ठिकाणी पत्रावळ्या, बाशिंग व इतर साहित्य पडलेले होते. या घटनेनंतर वाळूज गावावर शोककळा पसरली़ रामचंद्र मोटे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे़  

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातbarshi-acबार्शीmarriageलग्न