धक्कादायक; सोलापुरात ४३५ 'कोरोना' बाधित रुग्ण; आज तब्बल ५० रूग्ण वाढले..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:28 PM2020-05-18T21:28:05+5:302020-05-18T21:29:52+5:30

आज एका दिवसात तिघांचा मृत्यू; आत्तापर्यंत 165 रुग्णांनी 'कोरोना'वर केली मात

Shocking; 435 corona patients in Solapur; Today the number of patients has increased by 50 ..! | धक्कादायक; सोलापुरात ४३५ 'कोरोना' बाधित रुग्ण; आज तब्बल ५० रूग्ण वाढले..!

धक्कादायक; सोलापुरात ४३५ 'कोरोना' बाधित रुग्ण; आज तब्बल ५० रूग्ण वाढले..!

Next
ठळक मुद्देसोलापुरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढलीकोरोना बरोबर सारी या आजाराचेही आढळले रुग्णसोलापूर शहर पोलीस संचारबंदी काळात सतर्क

सोलापूर : सोलापुरात 'कोरोना' बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. सोलापूरात सोमवारी आणखीन ५० 'कोरोना' पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यात ३४ पुरूष आणि १६ महिलांचा समावेश आहे तर दरम्यान, आज तीन 'कोरोना' बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

आत्तापर्यंत ४६६३ व्यक्तींची कोरोना चाचणी घेण्यात आली यातील ४४१८ अहवाल प्राप्त झाले आहेत. यात ३९८३ निगेटिव्ह तर ४३५ पॉझिटिव्ह अहवाल आहेत. सोमवारी एका दिवसात ३१९ अहवाल प्राप्त झाले, यात २६९ निगेटिव्ह तर ५० पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. बरं झाल्यानं रूग्णालयातून ७ जणांना सोमवारी घरी सोडण्यात आलं. तर २४१ जण अजून रूग्णालयात उपचार घेत आहेत. आज जे ३ रूग्ण मृत पावले यात शुक्रवार पेठेतील ५४ वर्षीय पुरूष १६ मे रोजी दाखल झाले होते.

दरम्यान, दुसरी व्यक्ती हत्तुरे वस्ती परिसरातील ६० वर्षीय पुरूष दि. १५ रोजी सिव्हीलमध्ये दाखल झाले होते. तर तिसरी व्यक्ती शुक्रवार पेठे परिसरातील ५५ वर्षीय पुरूष असून ते दि. १४ मे रोजी सिव्हीलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते.

आज जे ५० रूग्ण मिळाले

ती ठिकाणं पुढीलप्रमाणे -

  • निलम नगर ४ पुरूष.
  • किसान संकुल अ.कोट रोड १ महिला.
  • हत्तुरे वस्ती १ पुरूष.
  • इरण्णा वस्ती १ पुरूष.
  • जोशी गल्ली १ पुरूष, १ महिला.
  • कुमठा नाका ३ पु रूष, २ महिला.
  • बुधवार पेठ १ पुरूष, १ महिला.
  • जुना कुंभारी नाका १ महिला.
  • अशोक चौक २ महिला.
  • नई जिंदगी १ पुरूष.
  • दत्त चौक १ पुरूष.
  • न्यू पाच्छापेठ १ महिला.
  • इंदिरा नगर १ पुरूष.
  • लोकमान्य नगर १ पुरूष.
  • मिलिंद नगर बुधवार पेठ ७ पुरूष, ५ महिला.
  • मोदी १ पुरूष.
  • मुरारजी पेठ १ पुरूष.
  • पाच्छा पेठ २ पुरूष.
  • रेल्वे लाईन्स २ पुरूष.
  • रविवार पेठ २ पुरूष, १ महिला.
  • साईबाबा चौक १ पुरूष, १ महिला.
  • शिवशरण नगर एमआयडीसी १ पुरूष.
  • साठे पाटील वस्ती १ पुरूष.
  • सिध्देश्वर पेठ १ पुरूष.

Web Title: Shocking; 435 corona patients in Solapur; Today the number of patients has increased by 50 ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.