शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

‘खड्ड्यात गेली युती’ म्हणणारी शिवसेना आता सत्तेसाठी लाचार; अशोक चव्हाण यांची टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:04 IST

सोलापूर : युती गेली चुलीत, उखाड देंगे, फेक देंगे, अशी भाषा करीत शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत स्वबळाचा नारा देणारी ...

ठळक मुद्देआघाडीची पहिली सभा नांदेडमध्ये होणार - अशोक चव्हाणमित्रपक्षांबरोबर काँग्रेसची आघाडी मात्र फक्त लोकसभेपुरती -अशोक चव्हाणआघाडीच्या जागावाटपाचे चित्र येत्या आठवड्यात स्पष्ट होईल - अशोक चव्हाण

सोलापूर : युती गेली चुलीत, उखाड देंगे, फेक देंगे, अशी भाषा करीत शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत स्वबळाचा नारा देणारी शिवसेना आज सत्तेसाठी लाचार झाल्याचे दिसून येत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे एका खासगी कार्यक्रमासाठी सोलापुरात आले आहेत. शिवसेना-भाजप युती होणार यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी शिवसेनेवर टीका केली. शिवसेनेचा भाजपविरोध किती पोकळ होता, हे यावरून दिसून येईल. 

समृद्धी महामार्गाचा विषय असो, भूसंपादन प्रक्रियेच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाला शिवसेनेने तीव्र विरोध केला. त्यानंतर कॅबिनेटमध्ये चर्चा करून समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची इच्छा शिवसेनेने व्यक्त केली. राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत की ज्यात शिवसेनेची दुटप्पी भूमिका दिसून येते. शिवसेनेने इतके वाभाडे काढूनसुद्धा भाजपा त्यांच्यासोबत जाते, यामध्ये दोघांची लाचारी दिसून येते.

शिवसेनेच्या बाबतीत अमित शहा व इतरांनी केलेली भाषणे पाहता सर्वसामान्यांनाही यांच्या युतीबद्दल धक्का बसला आहे. सत्तेसाठी हपापलेली शिवसेना इतका अपमान झाल्यावरही भाजपासोबत जाते. केवळ स्वत:चे अस्तित्व टिकविण्याची वेळ आल्याने सत्तेसाठी शिवसेना लाचार होताना दिसत आहे. 

मित्रपक्षांबरोबर काँग्रेसची आघाडी मात्र फक्त लोकसभेपुरती होणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. आघाडीच्या जागावाटपाचे चित्र येत्या आठवड्यात स्पष्ट होईल. काँग्रेस मित्र आघाडी पक्षाची पहिली प्रचार सभा २0 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता नांदेड येथे होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे -पाटील, शेकापचे जयंत पाटील, पीपल रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी परळी व २४ फेब्रुवारी रोजी लातूर येथे सभा होणार आहे. या दिवशी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. 

मनसेबरोबर आघाडी नाही- मनसेबरोबर आघाडीचा काँग्रेसचा प्रस्ताव नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.काँग्रेस व मनसेचे तात्त्विक मतभेद आहेत ते दूर झालेले नाहीत. मुंबईचा मनसेचा इतिहास पाहता आपण आघाडीबाबत अजिबात उत्सुक नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी मनसेबाबत आघाडीचे वक्तव्य केले होते आम्ही त्याला होकार कळविलेला नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण