शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना रोखणार भाजपच्या ताब्यातील परिवहनचे सव्वादोन कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 14:40 IST

सोलापूरच्या राजकारणात ठिणगी पडणार; सभापती गणेश जाधव यांनी व्यक्त केला संताप

ठळक मुद्देभाजपच्या ताब्यातील परिवहन उपक्रमाचे सव्वादोन कोटी रुपयांचे अनुदान रोखण्याची तयारी शिवसेनेच्या समाज कल्याण आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींनी सुरू केलीपरिवहन समितीचे सभापती गणेश जाधव यांनी तीव्र विरोध केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सेनेला याचा फटका बसेल, असा इशारा भाजप सदस्यांनी दिला

सोलापूर : भाजपच्या ताब्यातील परिवहन उपक्रमाचे सव्वादोन कोटी रुपयांचे अनुदान रोखण्याची तयारी शिवसेनेच्या समाज कल्याण आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापतींनी सुरू केली आहे. त्याला परिवहन समितीचे सभापती गणेश जाधव यांनी तीव्र विरोध केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत सेनेला याचा फटका बसेल, असा इशारा भाजप सदस्यांनी दिला आहे. 

सिटी बसमधून पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना आणि शहरातील दिव्यांग बांधव यांच्यासाठी मोफत प्रवासाची योजना राबविली जाते. या योजनेची महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीकडून दरवर्षी दीड कोटी रुपये तर कामगार व समाज कल्याण समितीकडून ८५ लाख रुपये दिले जातात. परिवहन उपक्रम आर्थिक अडचणीत आहे.

या दोन विभागांकडून मिळालेल्या अनुदानामुळे परिवहनला कर्मचाºयांचा पगार करण्यास मदत होते. दोन महिन्यांपूर्वी महिला व बालकल्याण आणि कामगार कल्याण समिती शिवसेनेच्या ताब्यात आली. या दोन्ही समित्यांकडेही आर्थिक चणचण आहे. महिला व बालकल्याण समितीकडून दरवर्षी दीड कोटी रुपये दिले जात असले तरी शहरातील मुलींना त्याचा म्हणावा तसा फायदा होत नाही. त्यामुळे या समितीकडून आता विद्यार्थिनींना पास दिले जातील. या पासनुसार परिवहनला पैसे दिले जातील, असे समितीच्या कुमूद अंकाराम यांचे म्हणणे आहे. शहरातील केवळ ४०० ते ५०० दिव्यांग बांधव सिटी बसमधून प्रवास करतात. त्यांच्यासाठी दरवर्षी ८५ लाख रुपये देणार नाही. 

त्याऐवजी ८५ लाख रुपयांमधून दिव्यांग बांधवांसाठी चांगली योजना राबवू, असे समाज कल्याण सभापती राजकुमार हंचाटे यांनी जाहीर केले आहे. शिवसेनेने हे पाऊल उचलल्यास परिवहनची मोठी अडचण होणार  आहे. 

तर पूर्व भागाला फटका : जाधव - परिवहन सभापती गणेश जाधव म्हणाले, सिटी बसच्या मोफत बस प्रवास योजनेचा सर्वाधिक फायदा पूर्व भागातील गोरगरीब विद्यार्थिनींना होतो. शिवाय यंत्रमाग, विडी कामगारही सिटी बसचा वापर करतात. शिवसेनेने अनुदान रोखले तर त्याचा सर्वाधिक फटका या भागातील नागरिकांना बसेल. कामगार कल्याण सभापती राजकुमार हंचाटे यांना ही बाब पटवून देण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना याचे उत्तर द्यावे लागेल. 

दिव्यांग बांधवांना सिटी बसच्या पासमध्ये ७५ टक्के सूट देण्याचे शासनाचे आदेश आहेत. परिवहन उपक्रम दिव्यांग बांधवांचे अर्ज घेत नाही. किती विद्यार्थिनींना मोफत बसचा लाभ दिला, याची माहिती समितीकडे उपलब्ध नाही. दिव्यांग बांधवांना मोफत पास देण्याऐवजी आम्ही त्यांना व्यवसायासाठी ५० हजार रुपयांची मदत करू. वैयक्तिक योजनांचा लाभ देऊ,. पण परिवहनला कोणत्याही परिस्थितीत अनुदान देणार नाही. - राजकुमार हंचाटेसभापती, कामगार व समाज कल्याण, महापालिका

युतीवर होणार परिणाम -  लोकसभा निवडणुकीदरम्यान महापालिकेत भाजप आणि शिवसेनेची युती झाली आहे. त्यानुसार परिवहन समितीसह इतर चार समित्या भाजपकडे तर तीन समित्या शिवसेनेला देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी परिवहन समिती शिवसेनेच्या ताब्यात होती. त्यावेळी भाजपने सेनेची अडचण केली होती. आता ही समिती भाजपच्या ताब्यात आल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी पलटवार केला आहे. त्यातून दोन्ही पक्षात पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBJPभाजपाShiv Senaशिवसेना