शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार नाही; हुसेन दलवाई स्पष्टच बोलले

By Appasaheb.patil | Updated: August 16, 2023 18:10 IST2023-08-16T18:09:51+5:302023-08-16T18:10:38+5:30

सध्या हुसेन दलवाई हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते जिल्ह्यातील विविध तालुक्यात बैठका घेत असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करीत आहेत.

Shiv Sena MLAs will not be disqualified; Hussain Dalwai spoke clearly | शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार नाही; हुसेन दलवाई स्पष्टच बोलले

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागणार नाही; हुसेन दलवाई स्पष्टच बोलले

सोलापूर - माजी मंत्री नबाब मालिकांना इतके दिवस आत का ठेवलं होते. आता कोणती जादू झाली की ते बाहेर आले, तेच कळत नसून शिवसेनेच्या आमदाराचा अपात्रेचा निकाल लागणार नाही. जरी निकाल लागला तरी यामध्ये सरकारला कोणताही धोका होऊ नये असा निकाल लावण्यात येणार असल्याचे मत माजी खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. 

सध्या हुसेन दलवाई हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते जिल्ह्यातील विविध तालुक्यात बैठका घेत असून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना विविध विषयावर मार्गदर्शन करीत आहेत. बुधवारी ते माढा तालुक्यात होते. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 

ते पुढे बोलताना म्हणाले की, भाजपाने सत्तेसाठी ईडीच्या धमकीने शिवसेना, राष्ट्रवादी फोडली असून येत्या काळात भाजप किती फुटणार हे पाहणे औत्सुक्याचे असल्याचेही मत माजी खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. महिलांबद्दल वाईट बोलणारे देशात दंगल घडविण्यासाठी बोलतात. ते देशात सध्या विष पेरत आहेत.  सरकार अशा वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर कोणतीच कारवाई करीत नसून भाजपनेही याबाबत विचार केला पाहिजे असा हल्लाबोल ही त्यांनी सरकारवर यावेळी केला. याचवेळी दलवाई यांनी मनोहर भिडे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी काँग्रेसचे नेते दादासाहेब साठे, बाबूल बागवान आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena MLAs will not be disqualified; Hussain Dalwai spoke clearly