धनगर आरक्षण मुद्यावरून शिवसेना सरकार पाडणार; उत्तमराव जानकर गौप्यस्फोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 15:38 IST2019-01-22T15:35:47+5:302019-01-22T15:38:12+5:30
पंढरपूर : पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने अद्याप आरक्षण जाहीर केले नाही; ...

धनगर आरक्षण मुद्यावरून शिवसेना सरकार पाडणार; उत्तमराव जानकर गौप्यस्फोट
पंढरपूर : पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणून सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने अद्याप आरक्षण जाहीर केले नाही; मात्र आता या मुद्यावर शिवसेना आक्रमक झाली असून, धनगर समाजास आरक्षण देण्याचा विषयच नाही फक्त नावातील दुरुस्तीसाठी पत्र देण्याची गरज आहे़ हे पत्र सरकारने दिले नाही तर शिवसेना सरकारचा पाठिंबा काढून घेऊन सरकार पाडणार असल्याचा गौप्यस्फोट उत्तमराव जानकर यांनी केला आहे.
उत्तमराव जानकर यांनी मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली़ त्यांचा सत्कारही करण्यात आला़ यावेळी बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, आ़ तानाजी सावंत, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते़ उत्तमराव जानकर यांना शिवसेना पक्ष प्रवेश आणि या भेटीसंदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले, ही भेट शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी नाही तर धनगर आरक्षणासंदर्भात झाली़ धनगर आरक्षणाच्या मुद्यावर आता शिवसेना आक्रमक झाली आहे.