Solapur: कर्नाटकविरोधात सोलापुरात शिवसेना आक्रमक; छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविल्याबद्दल संताप
By Appasaheb.patil | Updated: August 19, 2023 19:00 IST2023-08-19T18:59:20+5:302023-08-19T19:00:23+5:30
Solapur: कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याबद्दल साेलापुरात शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याचवेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज की जय च्या घोषणाही देण्यात आल्या.

Solapur: कर्नाटकविरोधात सोलापुरात शिवसेना आक्रमक; छत्रपती शिवरायांचा पुतळा हटविल्याबद्दल संताप
- आप्पासाहेब पाटील
सोलापूर - कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याबद्दल साेलापुरात शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. याचवेळी कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवाजी महाराज की जय च्या घोषणाही देण्यात आल्या.
दरम्यान, शिवसेना सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस दुग्धाअभिषेक करून कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे, कॉलेज कक्ष प्रमुख सुजित खुर्द, युवासेना शहर प्रमुख अर्जुन शिवशिंगवाले, अल्फरान आबादीराजे, नेहाल शिवशिंगवाले व आदी शिवसैनिक उपस्थित होते.