शिवसेना आक्रमक; रामदास कदमच्या प्रतिमेस पंढरपुरात जोडे मारो आंदोलन
By Appasaheb.patil | Updated: September 20, 2022 16:06 IST2022-09-20T16:05:07+5:302022-09-20T16:06:24+5:30
रामदास कदम यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

शिवसेना आक्रमक; रामदास कदमच्या प्रतिमेस पंढरपुरात जोडे मारो आंदोलन
सोलापूर : हिंदूहदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, माजीमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेनेच्या नेत्या रश्मी ठाकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करणारे शिंदे गटाचे रामदास कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून अनोखे आंदोलन करण्यात आले. पंढरपुरात शिवसेनेने मंगळवारी हे आंदोलन केले.
पंढरपूर तहसील कार्यालयासमोर शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, शिवसेना पंढरपूर तालुका प्रमुख संजय घोडके यांच्या नेतृत्वाखाली जोडेमारो आंदोलन करण्यात आले. याबाबत रामदास कदम यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर याचा जाहीर निषेध म्हणून आक्रमक व उग्र आंदोलन झेडण्यात येईल, आणि यामुळे होणार्या परिणामास महाराष्ट्र राज्य सरकार आणि प्रशासन तसेच खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असतील असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बुराडे, माऊली अष्टेकर, महेंद्र चव्हाण, बंडू घोडके, बाळासाहेब पवार, उमेश काळे, कानिफनाथ चव्हाण, लंकेश काकासाहेब बुराडे, प्रशांत जाधव, रेहाणा आतार भाबी, अजित शेवतकर, विजय गंगणे, अनिल कसबे, कैलास लोकरे, प्राणित पवार, कैलास नवले, अक्षय आठवले, संजय शिंगाडे, संदीप कसबे, अर्जुन भोसले, वैभव ननवरे, प्रल्हाद सुर्वे, जलिंदर शिंदे, मधुकर शिंदे, अनिल पवार, किरण सुतार, समाधान जगदाळे, कुमार कांबळे, महेश कांबळे, घोसपाक आतार, प्रभाकर गायकवाड, रहीम मुलाणी, अमित गायकवाड, समाधान गोरे, दत्ता शिंदे, पमू कुसुमडे, संजय पवार, तेजस राऊत, बाळासाहेब शेटे, संजय कृष्णा घोडके, रमेश लोखंडे, अंबादास लोखंडे, विजय दुधाळ, नामदेव चव्हाण, भागवत सरवदे, सूरज पाटील, गणेश गायकवाड, रफिलाल पठाण, हृषीकेश चव्हाण, मस्ता गायकवाड, संभाजी आसबे, रवी सावंत, महावीर हाके, शंकर सावंत, बळीराम देवकते, बापू संत, माऊली गोरे, नंदू भुते, बालरम पथरुत, प्रशांत बागडे, स्वप्निल गावडे, पिंटू रेड्डी, सौरव चौगुले, पिंटू पवार तसेच बहुसंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.