शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

शिंगडगावानं केलं ९७ कुत्र्यांचं ‘फॅमिली प्लॅनिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 12:05 IST

गावकºयांचा पुढाकार : निर्बीजीकरण अन् लसीकरण; ‘दिसला कुत्रा, टाका बिस्कीट अन् टाका जाळी’, गावातील दहशत संपुष्टात

ठळक मुद्देदक्षिण सोलापूर तालुक्यातील चार हजार लोकसंख्या असलेलं शिंगडगाव. कुत्र्यांचे निर्बिजीकरण अन् लसीकरणाने हे गाव पुन्हा एकदा आदर्शाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय.दिवसेंदिवस या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने ‘गाव तसं लहान, कुत्र्यांची संख्या मात्र महान’

जगन्नाथ हुक्केरी। सोलापूर : कुत्रा हा कुत्राच असतो. त्याची तुलना अन्य कोणाशी होत नसली तरी काही कुत्रे अन्नाला जागणारे इमानी असतात तर काही मोकाट आणि हिंस्त्रही. अशा या श्वानांची जमात मोठ्याने वाढून गावात दहशत निर्माण होऊ नये, म्हणून शिंगडगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेत ९७ नरांसह मादी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करून एका प्रकारे श्वानांच्या जमातीचे ‘फॅमिली प्लॅनिंग’चं केले आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील चार हजार लोकसंख्या असलेलं शिंगडगाव. जलयुक्तच्या कामामुळे जिल्ह्यात प्रकाशझोतात आलेलं गाव. आता कुत्र्यांचे निर्बिजीकरण अन् लसीकरणाने हे गाव पुन्हा एकदा आदर्शाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलंय. गावात शंभर ते सव्वाशे कुत्री. त्यात काही पाळीव. दिवसेंदिवस या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने ‘गाव तसं लहान, कुत्र्यांची संख्या मात्र महान’ अशीच प्रचिती येत होती. अशात बार्शी तालुक्यात कुत्र्याने एका चिमुरड्याच्या कानाचे लचके तोडल्याचे वृत्त गावात धडकले अन् सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टी यांनी अ‍ॅनिमल राहतच्या माध्यमातून कुत्र्यांचे कुटुंब नियोजन करण्याचे ठरविले. त्यानंतर ही मोहीम तीन टप्प्यात राबविण्यात आली.

काही पाळीव कुत्रे सोडून गावासह वाड्या-वस्त्यावरील कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले. यात मादीही सुटल्या नाहीत. त्यांचं गर्भाशय काढून एक प्रकारे कुटुंब नियोजनच या गावाने केलंय. ‘दिसला कुत्रा, टाका बिस्कीट अन् टाका जाळी’, अशा पद्धतीने कुत्र्यांना पकडून ही मोहीम फत्ते करण्यात आली. केवळ निर्बिजीकरण न करता अँटी रेबिज लसीकरणही करण्यात आले. याचा परिणाम वर्षभर कुत्र्याच्या शरीरात राहात असल्याने हे कुत्रे निर्बिजीकरणानंतर पिसाळत नाहीत. खरुज लागू नये, म्हणून कुत्र्यांना लसीकरणही करण्यात आले. यामुळे गावातील कुत्र्यांची दहशत आता पूर्णपणे संपली आहे.

असे केले आॅपरेशन- कुत्र्यांना पकडल्यानंतर आधी अँटी रेबिज, त्यानंतर पेन किलर देण्यात आले. कुत्र्याला टेबलावर झोपवून भूल देण्यात आले. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी आॅपरेशन केले. नराला आॅपरेशन करण्यासाठी कमी वेळ लागतो तर मादीला थोडा जास्त वेळ लागतो. ही प्रक्रिया करताना सलाईनही लावले गेले. हार्टची तपासणी, श्वासोच्छवास याचीही तपासणी करण्यात आली. कुत्रा शुद्धीवर आल्यानंतर त्यांना त्यांच्या ठिकाणी सोडण्यात आले. टाक्या घालण्यासाठी कॅटगट धागा वापरण्यात आला. यामुळे टाक्या काढण्याची गरज भासत नाही.

निर्बीजीकरणामुळे संख्या घटणार नाही- कुत्र्यांमध्ये प्रजनन क्षमता अधिक आहे. एकावेळी मादी चारपेक्षा जास्त पिलांना जन्म देते. आता गावात बहुतांश कुत्र्यांची नसबंदी केल्याने कुत्र्यांची संख्या वाढणार नाही. भविष्यात ही जमात नष्ट होईल, अशी भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण पाळीव कुत्र्यांना काहीच केले नाही. शिवाय बाहेरून येणाºया कुत्र्यांची संख्या जास्त असल्याने नियंत्रणात राहून ही संख्या आपोआप वाढणार आहे.

यांचा पुढाकार महत्त्वाचा- अ‍ॅनिमल राहतचे डॉ. राकेश चितोडा, डॉ. आकाश जाधव, डॉ. वर्षा पांचाळ यांच्यासह सहायक सोमनाथ देशमुख, भीमाशंकर विजापुरे, आनंद बिराजदार, अजित मोटे, सुधाकर ओव्हाळ, रसूल शेख यांनी आॅपरेशनचे काम केले तर सरपंच मल्लिकार्जुन पनशेट्टी, उपसरपंच गुरूबाई म्हेत्रे, राजेंद्र कोळी, हणमंत जमादार, महारुद्र बडुरे, सुभाष कोरे, संतोष म्हेत्रे, संतोष एकनाथे, महादेव कोल्हे, धुळप्पा बडुरे, शिवशंकर अचलेरे, सूर्यकांत पाटील, मल्लिकार्जुन मोळे, संजय हळ्ळे, धोंडिराज कोरे, ग्रामसेवक रमेश गायकवाड यांनी पुढाकार घेत ही मोहीम यशस्वी केली.

शिंगडगावसारख्या छोट्या गावामध्ये शंभर टक्के निर्बिजीकरण होऊ शकते तर मोठ्या शहरात का होऊ शकत नाही. यासाठी मानसिकता हवी. शासनाकडे सगळ्या गोष्टी, यंत्रणा आहेत. पण ही मोहीम यशस्वी होत नाही. यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेत शिंगडगावचा आदर्श घ्यावा.-डॉ. राकेश चितोडा, अ‍ॅनिमल राहत

टॅग्स :Solapurसोलापूरdogकुत्राhospitalहॉस्पिटलSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद