शशिकला मुकणार राज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:10 IST2021-01-08T05:10:49+5:302021-01-08T05:10:49+5:30

अक्कलकोट : महाराष्ट्र राज्य नगरपालिका-महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघातर्फे आदर्श शिक्षिका म्हणून न. प. प्राथ. शि. मं. अक्कलकोट येथील ...

Shashikala Muknar to be honored with State Ideal Teacher Award | शशिकला मुकणार राज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

शशिकला मुकणार राज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

अक्कलकोट : महाराष्ट्र राज्य नगरपालिका-महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघातर्फे आदर्श शिक्षिका म्हणून न. प. प्राथ. शि. मं. अक्कलकोट येथील शशिकला मुकणार यांचे राज्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

लोणावळा येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यावेळी राज्य अध्यक्ष अर्जून कोळी, कार्याध्यक्ष संजय आवळे, सल्लागार पंडितराव भंडारी, राज्यमहिला संघटक साधना साळुंखे यांच्या उपस्थितीत पार पडला.

मुकणार यांचे प्रशासनाधिकारी शाहू सतपाल यांनी आणि मुख्याध्यापक शंकर खजुर्गीकर, संघटनेचे अध्यक्ष महेश हंचाटे, उपाध्यक्ष रहीम शेख सरचिटणीस सिद्धाराम पुजारी, कोषाध्यक्ष मोहोळकर, कार्याध्यक्ष लिंबीतोटे, केंद्रीय मुख्याध्यापक अन्सारी, महिला शिक्षक संघटक लता तडकलकर, शिवशरण, संगीता बावलत्ती, सुनीता कुलकर्णी-भालेकर, केंद्रसमन्वयक ई. न. जमादार, गौरीशंकर कोळी, ज्येष्ठशिक्षक अयुब कलबुर्गी, मुख्याध्यापक हरवाळकर, उर्दू मुख्याध्यापिका बदरेजहाॅ यांनी कौतुक केले.

--

फोटो : ०६ शशीकला मुकणार

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते शशिकला मुकणार यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करताना पदाधिकारी.

Web Title: Shashikala Muknar to be honored with State Ideal Teacher Award