शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार पुन्हा भिजले, दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अवकाळी पावसात आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 09:47 IST

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्यावेळी साताऱ्यातील शरद पवार यांची सभा चांगलीच गाजली होती.

सोलापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सोलापूर दौरा वेगवेगळ्या अंगांनी चर्चेत आला आहे. राजीनामा नाट्यानंतर सोलापूर जिल्ह्यात झालेलं त्यांचं स्वागत, राष्ट्रवादी पक्षात युवा नेत्याचा झालेला पक्षप्रवेश, पंढरपूरच्या विठु-माऊलीचं दर्शन आणि चक्क अवकाळी पावसात भिजत आपल्या सहकाऱ्याच्या पुतण्याच्या लग्नात केलेली एंट्री. त्यामुळे, शरद पवारांची पुन्हा एकदा क्रेझ सोलापूर जिल्ह्यात दिसून आली. सध्या सोशल मीडियावर शरद पवारांचे या लग्नातील फोटो व्हायरल होत आहेत. 

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्यावेळी साताऱ्यातील शरद पवार यांची सभा चांगलीच गाजली होती. साताऱ्यातील पोटनिवडणुकीत विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासाठी त्यांनी सभा घेतली होती. या सभेवेळी अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. मात्र, सभेला आवर न घालता, शरद पवारांनी भरपावसात सभा घेतली. या सभेचा फोटो आणि व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. विशेष म्हणजे पावसातील ही सभा उदयनराजे भोसले यांच्या पराभवालाही कारणीभूत ठरली आणि ऐतिहासिक ठरली. त्यामुळे, शरद पवार आणि पावसातील सभा हे आठवणीतील समिकरणच तयार झाले आहे. आता, पुन्हा एकदा शरद पवार पावसात भिजल्याचे पाहायला मिळाले. सोलापूर दौऱ्यावर एका सहकाऱ्याच्या पुतण्याच्या लग्नासाठी ते आले असता, पावसात उभे राहून त्यांनी वधु-वरास आशीर्वाद दिले. 

सोलापूरचे राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर पंत सपाटे यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा आज पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे उपस्थित राहणार होते. मात्र अचानक लग्न सोहळ्या दरम्यान पाऊस सुरू झाला. या पावसामुळे साऱ्यांची तारांबळ उडाली. मात्र, भर पावसात शरद पवार यांचे आगमन झाले. त्यामुळे लग्न मांडवातील वातावरणही बदलून गेल्याचं दिसून आलं. दिवसभरातील व्यस्त दौरा आणि अचानक अवकाळी पावसाची झालेली हजेरी, यामुळे शरद पवार लग्नाला येतील की नाही, अशी शंका सपाटे कुटुंबीयांना होती. मात्र, शरद पवार आले, पावसात भिजले आणि वधु-वरास आशीर्वादही दिले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसmarriageलग्न