शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
2
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
3
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
4
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
5
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
6
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
7
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
8
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
9
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
10
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
11
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
12
रॅपिडो ड्रायव्हर महिन्याला कमावतोय १ लाख रुपये, उत्पन्नाचे स्रोत वाचून बसेल धक्का
13
...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल
14
"AI मुळे असे दिवस येतील की, ना नोकरी गरज असेल, ना पैशांची", एलन मस्क यांची मोठी भविष्यवाणी
15
"मी रुतबीला फिरायला नेतो..."; दीड वर्षांच्या लेकीला वडिलांनी फेकलं नदीत, हवा होता मुलगा
16
'धुरंधर' सिनेमात 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनची एन्ट्री, म्हणाली - "माझ्या सीन्सकडे..."
17
होम लोन स्वस्त आणि पर्सनल लोन महाग का असतं? बँका का ठेवतात व्याजदरात फरक, जाणून घ्या
18
“दिल्ली स्फोटानंतर काश्मिरींकडे संशयाने पाहिले जातेय”; ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केली खंत
19
मुंबईचा महापौर मराठी माणूस करणार का?; आशिष शेलारांचं उत्तर व्हायरल, "भाजपाचा महापौर हा..."
20
लोकलमध्ये हिंदीत बोलल्याने टोळक्याकडून मारहाण, व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन   
Daily Top 2Weekly Top 5

...याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का?; शहाजीबापू संतापले, मुख्यमंत्र्यांना विचारला थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 15:05 IST

लोकसभेला मोहिते पाटील घराण्याचा उमेदवार उभा होता. तरीही माझ्या तालुक्यातून १५ हजारांचे लीड भाजपा उमेदवाराला आहे असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं.

सांगोला - आजारपणाचा कुठलाही विचार न करता काम करत राहिलो, मृत्यूच्या दारात असतानाही लोकसभेच्या प्रचारात उतरलो. भाजपा उमेदवाराला १५ हजारांचं मताधिक्य दिले, याचं फळ म्हणून मला एकटं पाडलं का असा सवाल करत शिंदेसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकारणावरून शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.

शहाजीबापू पाटील म्हणाले की, मुख्यमंत्र्‍यांचा असा कुठला शब्द मी मोडला होता, हे त्यांनी सांगावे. लोकसभेला मोहिते पाटील घराण्याचा उमेदवार उभा होता. तरीही माझ्या तालुक्यातून १५ हजारांचे लीड भाजपा उमेदवाराला आहे. जर मी लोकसभेला प्रचार सोडून ऑपरेशन केले असते तर आज माझा आजार बिकट अवस्थेत गेला नसता. लवकर ऑपरेशन करा असं मला डॉक्टर सांगत होते, मात्र खासदारकी पार पाडल्यानंतर ऑपरेशन करायचे ठरवले. ३ महिने मी डॉक्टरांचा सल्ला ऐकला नाही मित्रपक्षाचा उमेदवार आहे, रणजितसिंह निंबाळकर मित्र होते, मी आपला जीव पणाला लावून प्रचारात उतरलो. सांगोल्यात जे घडतंय ते त्यांना कळत नाही का? असं त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले आहे.

शिंदेसेनेविरोधात विरोधक एकवटले

सांगोला नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत शुक्रवारी २१ नोव्हेंबर दुपारी ३ पर्यंत आहे. त्यानंतर इथले चित्र स्पष्ट होणार आहे. याठिकाणी भाजपा, शेकाप, दीपक आबा गट एकत्रित येऊन निवडणूक लढवत आहे. त्यात शिंदेसेनेने नगराध्यक्षपदासह २३ जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे सांगोला नगरपालिकेच्या मैदानात शिंदेसेना एकाकी पडली आहे. त्यावरून माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजपाला सवाल केला.

दरम्यान, नुकतेच शहाजीबापू पाटील यांनी भाजपावर अत्यंत घणाघाती टीका केली होती. भाजपाची शेकापशी युती म्हणजे दहशतवाद, एखाद्या आबलेवर केलेला अत्याचार असावा याच पद्धतीने भाजपाचे वागणे मला दिसून आले आहे. भाजपाचं राजकारण असं असेल तर ही युती हिडीस, किळसवाणी वागणूक असून या वैभवशाली महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा थोड्याच दिवसांत उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shahajibapu Patil questions CM, feels isolated after election efforts.

Web Summary : Shahajibapu Patil, upset, questions CM Fadnavis about being isolated despite his election efforts for BJP, even risking his health. He feels betrayed by local election alliances, especially with Shekap, after securing a significant lead for BJP in his constituency.
टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदे