शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

Good News; करमाळ्याच्या केळीची सातासमुद्री निर्यात; दररोज ५० कंटेनरची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 1:07 PM

उसाला निवडला पर्याय: २५ गावांतील शेतकºयांचा वाढला ओढा, वाशिंबेत युवा शेतकºयांचा पुढाकार..

ठळक मुद्दे वाशिंबे शिवारात ५०० एकर क्षेत्रात केळीच्या बागा उभ्या आहेतकरमाळा तालुक्यातील केळी परदेशात मुंबई येथील जेएनपीटीतून जहाजाने जातातकरमाळा तालुक्यातून इराण, इराक,रशिया,जपान, इटली, कुवेत या आखाती देशासह मुंबई, पुणे, हरियाणा, दिल्ली या शहरात केळी निर्यात होत आहेत

नासीर कबीरकरमाळा : करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात उजनीच्या लाभक्षेत्रात कंदर, वांगी, चिखलठाण, बिटरगाव-वां, कुगाव, वाशिंबे, केत्तूर, पोमलवाडी, सोगाव, हिंगणी, टाकळी, कोंढारचिंचोली, कात्रज, खातगाव, उम्रड आदी २५ गावशिवारातील  शेतकरी ऊस पिकाला पर्याय म्हणून केळीचे उत्पादन घेऊ लागले असून, या भागात उत्पादित केळी सातासमुद्रापार चालली आहे.

करमाळा तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रातील  पुनर्वसित शेतक ºयांनी ऊस पिकाला पर्याय म्हणून केळीचे पीक घेण्यास सुरुवात केली आहे. उसाच्या गाळपासाठी शेतकºयाला प्रत्येक वर्षी कारखानदारांचे उंबरठे झिजवावे लागतात व उसाला भाव मिळत नसल्याने शेतकºयांना  मनस्ताप सहन करून आर्थिक नुकसान सहन करावे लागते. ते टाळण्यासाठी शेतकरी केळीचे उत्पादन घेण्याकडे वळला आहे.

सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस पडला तरी पुणे जिल्ह्यात पडणाºया पावसाने उजनी धरण शंभर टक्के भरते. त्याच्याच जोरावर उजनी पट्ट्यात केळीचे उत्पादन घेतले जाऊ लागले आहे. करमाळा तालुक्यात उजनी लाभक्षेत्रात तीन हजार हेक्टर क्षेत्रात केळीचे उत्पादन घेतले गेले आहे. तालुक्यातून दररोज ५० ते ६० कंटेनर केळी विक्रीसाठी जात आहे. त्यामुळे ऊस पिकवणारा पट्टा आता केळीचे आगार म्हणून नावारुपाला येऊ पाहत आहे. करमाळा तालुक्यातून इराण, इराक,रशिया,जपान, इटली, कुवेत या आखाती देशासह मुंबई, पुणे, हरियाणा, दिल्ली या शहरात केळी निर्यात होत आहेत. विशिष्ट आकार व चवीची केळी उत्पादित होत असल्याने येथील केळींना मागणी आहे. केळी हे बाराही महिने चालणारे फळ असल्याने त्याला मोठी मागणी असते. करमाळा तालुक्यातील केळी परदेशात मुंबई येथील जेएनपीटीतून जहाजाने जातात.

वाशिंबेत युवा शेतकºयांचा पुढाकार..वाशिंबे येथे केळीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, वाशिंबे शिवारात ५०० एकर क्षेत्रात केळीच्या बागा उभ्या आहेत. शंकर निवृत्ती झोळ यांची केळी मलेशिया,इराण येथे निर्यात झालेली आहेत. शंकर झोळ यांनी तीन एकरात  १०० टन उत्पादन घेतले आहे. युवराज झोळ, संजय शिंदे,रणजित शिंदे,भाऊ झोळ हे युवा शेतकरी केळी पिकाकडे वळले आहेत. तालुक्यात सर्व प्रथम कंदरच्या शेतकºयांनी उसाला ब्रेक देऊन केळी पिकाकडे वळून निर्यातक्षम केळी तयार करून त्याची परदेशात विक्री केली. उसापेक्षा जास्त पैसा केळी पिकापासून मिळू लागल्याने युवा शेतकरी केळी पिकाकडे वळू लागले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरMarketबाजारInternationalआंतरराष्ट्रीयfruitsफळेkarmala-acकरमाळा