काशीपीठातील सेवारत्न हरपले : काशीजगद्गुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:27+5:302020-12-30T04:29:27+5:30

पंचाक्षरी लिगाडे यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. ते म्हणाले, पंचाक्षरी लिगाडे यांनी १९७२ पासून ते २०२० पर्यंत ...

Sevaratna lost in Kashi Peetha: Kashijagadguru | काशीपीठातील सेवारत्न हरपले : काशीजगद्गुरू

काशीपीठातील सेवारत्न हरपले : काशीजगद्गुरू

पंचाक्षरी लिगाडे यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते बोलत होते. ते म्हणाले, पंचाक्षरी लिगाडे यांनी १९७२ पासून ते २०२० पर्यंत काशीपीठात राहून तन-मन-धनाने पीठाची सेवा केली. लिं. जगद्गुरू श्री विश्वेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि विद्यमान जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे ते अत्यंत विश्वासू होते. ते शिवैक्य झाल्यामुळे पीठामधील एक निःस्वार्थ सेवक हरपला असून, पीठाची मोठी हानी झाली, अशी खंत महास्वामीजींनी व्यक्त केली. दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला काशीपीठात त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाईल, असे महास्वामीजी म्हणाले.

यावेळी ॲड. उदयभान सिंह, प्रा. बसवप्रभू जिरली, मठाच्या व्यवस्थापिका नलिनी चिरमे, लिगाडे परिवारातील बंधू, विश्वाराध्य गुरुकुलाचे विद्यार्थी सिद्धलिंग स्वामी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी काशीमधील व्यापारी मंडळाचे अनेक सदस्य तसेच विश्वाराध्य गुरुकुलाचे विद्यार्थी उपस्थित होते.

-----

Web Title: Sevaratna lost in Kashi Peetha: Kashijagadguru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.