ज्येष्ठ साहित्यिक सुमेरचंद जैन यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 04:44 IST2019-05-27T04:44:29+5:302019-05-27T04:44:34+5:30

ज्येष्ठ साहित्यिक, जैन साहित्याचे विद्वान व साहित्य अकादमी हिंदी भाषा सन्मान पुरस्कार विजेते सुमेरचंद जैन (वय ९५) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

Senior literary Sumerchand Jain passes away | ज्येष्ठ साहित्यिक सुमेरचंद जैन यांचे निधन

ज्येष्ठ साहित्यिक सुमेरचंद जैन यांचे निधन

सोलापूर : ज्येष्ठ साहित्यिक, जैन साहित्याचे विद्वान व साहित्य अकादमी हिंदी भाषा सन्मान पुरस्कार विजेते सुमेरचंद जैन (वय ९५) यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले. मूळ विदर्भातील कारंजा येथील असलेले सुमेरचंद जैन १९४८ साली येथील वालचंद शिक्षण समूहाच्या जैन गुरुकुल येथे मुख्याध्यापक म्हणून आले. २०१२ मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा हिंदी भाषा सन्मान पुरस्कार मिळाला होता. ते जैन धर्माचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी ४० बाल साहित्यकृती, ४ कादंबऱ्या, नाटक, ८ ललित वाङ्मय, ७ तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ, जैन धर्माचे १५ धार्मिक ग्रंथ व १० कोषवाङ्मय ग्रंथांचे लेखन केले आहे.

Web Title: Senior literary Sumerchand Jain passes away