टेंभुर्णीत मुलां-मुलींना दिले स्वसंरक्षणाचे धडे, शिवकालिन खेळांचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:02 IST2021-02-20T05:02:36+5:302021-02-20T05:02:36+5:30

मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात करमाळा चौकातील महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी सभापती विक्रमसिंह ...

Self-defense lessons given to boys and girls in Tembhurni, demonstrations of Shiva-era games | टेंभुर्णीत मुलां-मुलींना दिले स्वसंरक्षणाचे धडे, शिवकालिन खेळांचे प्रात्यक्षिक

टेंभुर्णीत मुलां-मुलींना दिले स्वसंरक्षणाचे धडे, शिवकालिन खेळांचे प्रात्यक्षिक

मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात करमाळा चौकातील महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी सभापती विक्रमसिंह शिंदे, शिवसेनेचे संजय कोकाटे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, भाजप तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, शिवसेना तालुका प्रमुख मधुकर देशमुख, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा सुरजा बोबडे, भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष धनश्री खटके, पं. स. सदस्य धनाजी जवळगे, शिवस्मारक मंडळाचे अध्यक्ष भाऊ देशमुख, नागनाथ वाघे, जयवंत पोळ, परमेश्वर खरात, सुरेश लोंढे, हरिभाऊ सटाले, विलास कोठावळे, गिरीश ताबे, दयानंद महाडिक, बी. पी. लिमकर, राहुल तिपाले, राजू पाटील आदी उपस्थित होते.

गुरुवारी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी पुतळ्यासमोर दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. शिवजन्मोत्स मंडळाने शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.

Web Title: Self-defense lessons given to boys and girls in Tembhurni, demonstrations of Shiva-era games