शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर नव्या सहा सदस्यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 4:34 AM

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर मंदिर समितीत नव्याने सहा सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

मुंबई/ पंढरपूर (जि. सोलापूर) -  अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी गहिनीनाथ महाराज औसेकर यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर मंदिर समितीत नव्याने सहा सदस्यांची निवड करण्यात आली आहे.२ जुलै रोजी अध्यक्षांसह ९ सदस्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये अध्यक्षपदी डॉ. अतुल भोसले, तर सदस्य म्हणून आ़ राम कदम, शकुंतला नडगिरे, दिनेशकुमार कदम, सचिन अधटराव, ह़ भ़ प़ भास्करगिरी गुरू किसनगिरी बाबा, ह़ भ़ प़ गहिनीनाथ महाराज औसेकर, संभाजी शिंदे, पदसिद्ध नगराध्यक्ष साधना भोसले यांची निवड करण्यात आली होती.श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कामकाजासाठी राज्य शासनाने स्वतंत्र कायदा केला आहे. या कायद्यानुसार समितीच्या सदस्यांची एकूण संख्या १२ वरून १५ इतकी वाढविण्यासाठी आणि सदस्यांची संख्या ९ वरून १४ इतकी करण्यासाठी सुधारणा करण्यात आली आहे.त्यामुळे नव्याने मंदिर समितीच्या सदस्यपदी ह़ भ़ प़ ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, माधवी निगडे, अतुल भगरेशास्त्री, शिवाजीराव मोरे, ह़ भ़ प़ प्रकाश महाराज जवंजाळ, आ. सुजितसिंह ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.सहअध्यक्षपदी वारकरी प्रतिनिधी असावा, अशी मागणी वारकऱ्यांमधून होत होती. यामुळेच ह़ भ़ प़ गहिनीनाथ महाराज औसेकर यांची निवड करण्यात आलीआहे़पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कामकाजासाठी वरिष्ठ वारकºयांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी वारकºयांचा समावेश असलेल्या एका मार्गदर्शक समितीची लवकरच स्थापना करण्यात येणार आहे. त्यामळे मंदिर समितीचा कारभार अधिक लोकाभिमुख व रूढी, परंपरेनुसार होण्यास मदत होणार आहे.- चंद्रकांत पाटील, सहकार मंत्रीसहअध्यक्ष - गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकरविधान परिषद सदस्य - सुजितसिंंह मानसिंह ठाकूरसदस्य - ह.भ.प. ज्ञानेश्वर नामदेव देशमुख (जळगांवकर)सदस्य - अ‍ॅड. माधवी श्रीरंग निगडेसदस्य - प्रकाश रुस्तुमराव जवंजाळसदस्य - भागवतभूषण अतुलशास्त्री अशोकराव भगरेसदस्य - ह.भ.प. शिवाजीराव मोरे

टॅग्स :PandharpurपंढरपूरMaharashtraमहाराष्ट्र