करमाळा बाजार समितीच्या सचिवाला मुदतवाढ नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:20 IST2021-05-24T04:20:54+5:302021-05-24T04:20:54+5:30
करमाळा : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे यांच्या सेवानिवृत्तीच्या मुदतवाढ मागणीच्या अर्जावर बाजार समितीच्या मासिक ...

करमाळा बाजार समितीच्या सचिवाला मुदतवाढ नाकारली
करमाळा : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे यांच्या सेवानिवृत्तीच्या मुदतवाढ मागणीच्या अर्जावर बाजार समितीच्या मासिक सभेत नाट्यमय घडामोडींनंतर मतदान घेण्यात आले. आठ- आठ समसमान मतदान झाल्याने सभापती शिवाजी बंडगर यांच्या विशेषाधिकार मतांच्या अधिकाराने आठ विरुद्ध नऊ मताने सचिव शिंदे यांना मुदतवाढ नाकारण्यात आली.
सभेत सचिव शिंदे यांचा मुदतवाढीचा अर्ज सभेत चर्चेला आला. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सुरवातीस मुदतवाढीला विरोध केला. यावेळी दिग्विजय बागल यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला. मात्र, नंतर जगताप यांनी शिंदे यांना मुदतवाढ देण्याची मागणी केली. जगताप यांच्या विरोधी भूमिकेवर सभापती बंडगर यांनी सभेत पणनची नियमावली सांगत विरोध केला. माजी आमदार जगताप यांनी मुदतवाढीचा आग्रह लाऊन धरला. अखेर हा विषय मताला टाकण्याची सूचना बागल यांनी मांडली.
यावेळी सभेस बागल गटाचे संचालक सुभाष गुळवे व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे हजर न राहिल्याने आणि माजी आमदार नारायण पाटील गटाचे संचालक दत्तात्रय रणसिंग यांनी ऐनवेळी मुदतवाढीला पाठिंबा दिला. वालचंद रोडगे यांनी मात्र मुदतवाढीला विरोध दर्शविला. समसमान मतदान झाल्याने पेच निर्माण झाला. सभापती बंडगर यांना विशेषाधिकार वापरावा लागला.
या बैठकीस बागल गटाकडून दिग्विजय बागल, उपसभापती चिंतामणी जगताप, रंगनाथ शिंदे, आनंदकुमार ढेरे, सरस्वती केकान, अमोल झाकणे, नारायण पाटील गटाकडून सभापती प्रा. बंडगर, सावंत गटाकडून वालचंद रोडगे यांनी बहुमताने प्रभारी सचिव म्हणून राजेंद्र पाटणे यांच्या नावाला पाठिंबा दिला.