शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चारा वाटपासाठी सोलापूर जिल्ह्यात बियाणांचा दुष्काळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 14:52 IST

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीत ज्या शेतकºयांकडे चारा उत्पादन करण्यासाठी पाणी आहे त्यांना शासनाने बियाणे देण्याचा कार्यक्रम डिसेंबर महिन्यात हाती ...

ठळक मुद्देदुष्काळी परिस्थितीत ज्या शेतकºयांकडे चारा उत्पादन करण्यासाठी पाणी आहे त्यांना शासनाने बियाणे देण्याचा कार्यक्रम डिसेंबर महिन्यात हाती घेतलाया योजनेतून ९७ कोटी रुपयांचे बियाणे वाटप करण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीत ज्या शेतकºयांकडे चारा उत्पादन करण्यासाठी पाणी आहे त्यांना शासनाने बियाणे देण्याचा कार्यक्रम डिसेंबर महिन्यात हाती घेतला. या योजनेतून ९७ कोटी रुपयांचे बियाणे वाटप करण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात एका शेतकºयास केवळ पाच किलोच बियाणे देण्यात आले आहेत, प्रत्येक गावात केवळ फोटोसेशनपुरतेच कार्यक्रम झाल्याची प्रतिक्रिया जि.प. सदस्य भारत शिंदे यांनी दिली.

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून राज्य शासनाने शेतकºयांना चारा लागवडीसाठी बियाणे मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शेतकºयांनी कृषी खात्याकडे अर्ज दाखल केले होते. शेतकºयास उपलब्ध असलेल्या पाण्याच्या सुविधेनुसार त्याच्या क्षेत्रानुसार बियाणे देण्याचा नियम असताना सरसकट सर्वच शेतकºयांना केवळ पाच किलोची एकच पिशवी देण्यात आल्याच्या तक्रारी ग्रामीण भागातील शेतकºयांकडून करण्यात येत आहेत. 

राज्य शासनाच्या नेहरू नगर येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयाकडून जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती स्तरावरील तालुका पशुवैद्यकीय अधिकाºयांना बियाणे देण्यात आले होते. तालुका अधिकाºयांनी सहायक पशुधन विकास अधिकारी यांना बियाणे शेतकºयांना वाटप करण्यासाठी दिले आहेत. ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील महिन्यातच बियाणांचा पुरवठा झाला. मात्र प्रत्येक गावातील प्रति शेतकºयास पाच किलोच बियाणे देण्यात आल्याचे समोर येत आहे. त्यामुळे अजूनही काही दवाखान्यात बियाणे पडून असून या बियाणांचा करणार तरी काय, असा प्रश्न शेतकºयांतून उपस्थित होत आहे.

कसले बियाणे.. कोणते बियाणे... : तानवडे- याबाबत जि.प. पक्षनेता आनंद तानवडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कसले बियाणे वाटप झाले. कोणते बियाणे वाटप झाले. कधी झाले असा उलट प्रश्न उपस्थित केला. आपल्या मतदारसंघात तरी असा कोणताही कार्यक्रम किंवा उपक्रम झाला नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सगळ्यांना देणे शक्य नाही, ज्यांना पाणी आहे, त्यांना मिळतील : डॉ. चंद्रशेखर दैवज्ञच्बियाणांसाठी शेतकºयांची एकाचवेळी मागणी जास्त होती. त्यामुळे मागणी केलेल्या अनेक शेतकºयांना चारा उत्पादन करण्यासाठी त्यांना पाच किलो बियाणे देण्यात आले आहेत. काही शेतकºयांकडे पाणी अजूनही उपलब्ध असल्यास, त्याबाबत खात्री करून त्यांना पुन्हा अधिक बियाणे देण्यात येतील, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चंद्रशेखर दैवज्ञ यांनी दिली. 

केवळ बियाणे वाटपाचा फार्स : भारत शिंदेचारा उत्पादनासाठी शेतकºयांना बियाणे देण्यात आल्याचे नेहमीच अधिकाºयांकडून बैठकीत सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र प्रत्येक तालुक्यात ठराविक गावात ठराविक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत फोटोसेशनपुरतेच बियाणे वाटप कार्यक्रम झाला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी होणे गरजेचे असून, शेतकºयांना शासनाकडून आलेले सर्व बियाणे मिळणे अपेक्षित आहे, असे मत जि.प. सदस्य भारत शिंदे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदagricultureशेती