शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus; सोलापुरातील शाळा, जलतरण तलाव, व्यायामशाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 10:53 IST

अ‍ॅडमिट असलेल्या पाचपैकी एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह; सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन 

ठळक मुद्देनागरिकांनी ३१ मार्चपर्यंत किरकोळ कामासाठी शासकीय कार्यालयात येण्याचे टाळावेजिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात येणारी निवेदने व तक्रारी टपाल किंवा ई-मेलमार्फत कराव्यातनागरिकांनी स्वत:हून गर्दी टाळण्याची बंधने पाळावीत. गरज असेल तरच घराबाहेर पडावे

सोलापूर : कोरोना साथीचा प्रतिबंध करण्यासाठी शहरातील शाळांबरोबर आता जिल्ह्यातील सर्व शाळा, जलतरण तलाव, चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी  पत्रकार परिषदेत दिली. मंगळवार, बुधवार बाजाराबाबत मात्र मंगळवारी निर्णय घेतला जाणार आहे. 

कोरोना साथीचा प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. शहरातील शाळा सोमवारपासून बंद करण्यात आल्या आहेत. आता जिल्ह्यातील सर्वच शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर जलतरण तलाव, जिम ३१ मार्चपर्यंत बंद राहतील. जीवनावश्यक वस्तूंची विक्री असलेली दुकाने सुरूच राहतील, पण या ठिकाणी गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. आठवडा बाजारही बंद करावेत, अशी मागणी होत आहे. पण यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. मंगळवारी सर्व यंत्रणांशी चर्चा करून बाजाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे. 

नागरिकांनी गर्दी टाळावी- पुणे, मुंबईकडून गावाकडे परतणाºयांचा लोंढा वाढला आहे. रेल्वेने किंवा इतर वाहनाने येणाºयांना प्रतिबंध करणे शक्य नसले तरी नागरिकांनी स्वत:हून गर्दी टाळण्याची बंधने पाळावीत. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. मेळावे, सभा, यात्रा, जत्रांना बंदी घातली आहे. याचे उल्लंघन होणार नाही, यासाठी पोलिसांवर जबाबदारी दिली आहे. बंदी आदेश असतानाही शहरात कार्यक्रम झाल्याच्या तक्रारी आहेत, याबाबत खातरजमा करून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

शासकीय कार्यालयांनाही नियम- सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महापालिकेत नागरिकांनी विविध कामांसाठी गर्दी केल्याचे दिसून आले. नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत किरकोळ कामासाठी शासकीय कार्यालयात येण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात येणारी निवेदने व तक्रारी टपाल किंवा ई-मेलमार्फत कराव्यात, असे सूचित केले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोनाSchoolशाळाEducationशिक्षणHealthआरोग्य