शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळकºयानाही आता प्रोजेक्टरद्वारे धडे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 14:44 IST

जिल्ह्यात १०० टक्केशाळा डिजिटलच्या वाटेवर; फळा खडूच्या जागी स्क्रीन

ठळक मुद्देव्हिडीओमार्फत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर देण्यात येणार शिक्षण विभागाला सूचना देऊन सर्व शाळा डिजिटल करण्यासाठी सूचना सर्व शाळांमध्ये ही प्रक्रिया पूर्णत्वास

सोलापूर : राज्यात अन् देशात डिजिटलचे वारे वाहत असताना सोलापूर झेडपीच्या शिक्षण विभागाच्या जिल्ह्यातील प्राथमिक शाळा १०० टक्के डिजिटल होण्याच्या वाटेवर आहेत. ३१ आॅक्टोबर रोजी याची अधिकृत घोषणा होणार आहे. या उपक्रमामुळे आता फळा अन् खडूची जागा स्क्रीन आणि इलेक्ट्रिकने पेनने घेतल्याचे दिसले तर नवल वाटू नये. 

सोलापूर जिल्ह्यात झेडपीच्या शिक्षण विभागाच्या २ हजार ८०५ शाळा कार्यरत आहेत. या शाळांमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून मुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. सध्या देशभरात डिजिटल इंडियाची चलती सुरु आहे. केंद्र आणि राज्यस्तरावर याचा अंमल होण्यासाठी जागर केला जात आहे.

झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी मूलभूत शिक्षणाचा पाया असलेल्या प्राथमिक शाळांमध्येही बदलत्या शिक्षण प्रणालीचा अंगीकार व्हावा, यासाठी शिक्षण विभागाला सूचना देऊन सर्व शाळा डिजिटल करण्यासाठी सूचना केल्या. प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकाºयांमार्फत १९९ केंद्रप्रमुखांना ३१ आॅक्टोबरपर्यंत सर्व शाळा डिजिटल कराव्यात, असे परिपत्रक पाठवले होते. त्यानुसार सर्व शाळांमध्ये ही प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. 

झेडपीच्या प्राथमिक विभागात जिल्ह्यात तालुकानिहाय शाळांमध्ये अक्कलकोट २५७, बार्शी १७९, करमाळा २३१, माढा २९४, , माळशिरस ३८८, मंगळवेढा १८३, मोहोळ २८४, पंढरपूर ३४०, सांगोला ३८९, उत्तर सोलापूर १००, दक्षिण सोलापूर १९१ अशा एकूण २८०५ शाळा कार्यरत आहेत. या सर्व शाळांमध्ये संगणक, एलसीडी, स्क्रीन प्रोजेक्टरची सोय करण्यात आली आहे. यांच्या माध्यमातून सर्व विषयांचा अभ्यास शिक्षकांमार्फत राबविला जाणार आहे.

स्क्रीन प्रोजेक्टरद्वारे अभ्यासाच्या अनुषंगाने व्हिडीओमार्फत विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर देण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. डिजिटल शाळांचा आढावा घेण्यासाठी झेडपीचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी ३१ आॅक्टोबर रोजी बैठक आयोजित केली आहे. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांच्या सहीने अहवाल सादर करण्यात येणार आहे. या दिवशी डिजिटल शाळांबद्दल अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. 

पालकांनो, मातृभाषेतून शिक्षणासाठी पुढाकार घ्या!खासगी शाळांच्या धर्तीवर झेडपीच्या शाळांमधील शिक्षणाबद्दल पालकांमध्ये, जनतेमध्ये असलेले समज दूर करण्याच्या दृष्टीने नवनवीन तंत्र अवलंबले जात आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी नावीन्यपूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातोय. पालकांनी इंग्रजी शाळांच्या मागे न धावता आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा. आमच्या शाळांमधील ब्लेझरयुक्त शिक्षक मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी सक्षम आहेत. डिजिटल शाळा हा उपक्रमही त्याचाच एक भाग असल्याची प्रतिक्रिया झेडपीचे सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाdigitalडिजिटलSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदStudentविद्यार्थी