शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

चोरांच्या धास्तीने दोन एकर ऊस पेटविला

By admin | Updated: November 5, 2014 15:13 IST

चोरीला दोन दिवस उलटले, पोलिसांत फिर्याद दिली, गावकर्‍यांसह पीडितांनी चोरांचा माग शोधला, पण ते सापडले नाहीत. शेवटी उसात चोर लपल्याची अफवा पसरली.

सोलापूर : चोरीला दोन दिवस उलटले, पोलिसांत फिर्याद दिली, गावकर्‍यांसह पीडितांनी चोरांचा माग शोधला, पण ते सापडले नाहीत. शेवटी उसात चोर लपल्याची अफवा पसरली. सगळ्या बाजूने उसाला घेराव घालण्यात आला. पोलिसांना कळविले. दरम्यान काही ग्रामस्थांनी उसात चोर लपलेत ना, मग ऊसच पेटवू, असा निर्णय घेऊन गाळपाच्या मार्गावर असलेला दोन एकर ऊस पेटवून देण्यात आला. पाहता पाहता नगदी पीक ऊस जळून खाक झाला. हा प्रकार कंदलगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथे मंगळवारी सकाळच्या सुमारास घडला. संगप्पा साबा यांच्या वस्तीवर दोन दिवसांपूर्वी चोरी झाली. यात ६६ हजारांचा ऐवज पळविण्यात आला. पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांसह गावकर्‍यांनी चोरांचा शोध घेतला. मात्र चोर काही सापडले नाहीत. मंगळवारी सकाळच्या सुमारास उसात चोर लपल्याची अफवा पसरविण्यात आली. यामुळे सगळ्यांनी फडाला गराडा घातला. आराडाओरडा, आरोळी ठोकून झाली. चोर काही बाहेर आले नाहीत. पोलीस घटनास्थळावर पोहोचायला काही मिनिटे शिल्लक असताना एकाने उसाच्या फडाला पेटवून देण्याची शक्कल लढविली. स्वत: साबा यांनीही होय, नाही म्हणून दुजोरा दिला. काडी ओढली आणि उभा ऊस पाचच मिनिटांत जळून खाक झाला. चोरही सापडले नाहीत आणि चोरीचा मुद्देमालही.