शेतात बांध का घातला, म्हणत तरुणावर कोयत्याच्या दांड्याने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST2021-09-18T04:23:52+5:302021-09-18T04:23:52+5:30

शिरभावी येथील यशवंत लक्ष्मण बंडगर गुरुवारी सायंकाळी ६:३०च्या सुमारास त्यांच्या नवीन घेतलेल्या शेतात बांध घालून तेथेच थांबले होते. त्यावेळी ...

Saying why a dam was built in the field, the young man was beaten with a scythe | शेतात बांध का घातला, म्हणत तरुणावर कोयत्याच्या दांड्याने मारहाण

शेतात बांध का घातला, म्हणत तरुणावर कोयत्याच्या दांड्याने मारहाण

शिरभावी येथील यशवंत लक्ष्मण बंडगर गुरुवारी सायंकाळी ६:३०च्या सुमारास त्यांच्या नवीन घेतलेल्या शेतात बांध घालून तेथेच थांबले होते. त्यावेळी विठ्ठल नाना नलवडे यांनी जवळ येऊन तू येथे बांध घालून रस्ता का बंद केला, म्हणून शिवीगाळ केली. एवढ्यावरच न थाबंता फोन करून केशव पांडुरंग नलवडे, अजित विठ्ठल नलवडे, सीताराम भोईटे, संजय राणोबा नलवडे, दत्तात्रय धोंडिबा नलवडे यांना बोलावून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. केशव नलवडे यांनी त्याच्या हातातील कोयत्याच्या दांड्याने तोंडावर, पाठीत व हातावर मारून जखमी केले. हा प्रकार घडत असताना वडील लक्ष्मण बंडगर, चुलते परमेश्वर बंडगर, भावासह रस्त्याने जाणाऱ्या लोकांनी त्यांची भांडण सोडवासोडवी केली. याबाबत यशवंत लक्ष्मण बंडगर (रा. शिरभावी) यांनी सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

----

Web Title: Saying why a dam was built in the field, the young man was beaten with a scythe