स्वातंत्र्यपूर्व काळातील महालक्ष्मीच्या मुखवट्याचे तिसºया पिढीकडून जतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:40 IST2019-09-06T13:38:24+5:302019-09-06T13:40:39+5:30
अकलूज; १०५ वर्षांपूर्वी पणजीकडून मिळालेल्या महालक्ष्मीची गुळवे परिवाराकडून स्थापना

स्वातंत्र्यपूर्व काळातील महालक्ष्मीच्या मुखवट्याचे तिसºया पिढीकडून जतन
पंढरपूर : स्वातंत्र्यपूर्व काळात १०५ वर्षांपूर्वी पणजीकडून मिळालेल्या महालक्ष्मीच्या मुखवट्याचे जतन करून आजच्या तिसºया पिढीतील अकलूज येथील गुळवे परिवारात बसवून परंपरेने महालक्ष्मी सण साजरा केला जात आहे.
अकलूज येथील गुळवे घराणे जुने घराणे म्हणून ओळखले जाते. येथीलच जगन्नाथ शेटे व कासाबाई शेटे यांची कन्या गोदाबाई यांचे गुळवे परिवारातील शंकरराव गुळवे यांच्याशी १९१३ साली विवाह झाला होता. लग्नानंतर कासाबाई शेटे यांनी सन १९१४ साली कन्या गोदाबाई यांना महालक्ष्मीचा मुखवटा दिला.
गुळवे परिवारातील व शेटे परिवारातील माहेरचा महालक्ष्मीचा मुखवटा असे दोन परिवारांचे महालक्ष्मीचे मुखवटे मिळून गोदाबाई गुळवे या महालक्ष्मी सण साजरा करु लागल्या. त्यांच्यानंतर लिलावती शिवमूर्ती गुळवे व रतन सोमनाथ गुळवे या सुना स्वातंत्र्यानंतर १९५० सालापासून सासूच्या महालक्ष्मी बसवू लागल्या. त्यांच्या पश्चात १९८६ पासून पद्मजा चंद्रशेखर गुळवे, वैशाली दत्तात्रय गुळवे व उत्कर्षा गोपाळ गुळवे या तिसºया पिढीतील सुना महालक्ष्मी आजतागायत बसवित आहेत.
रंगरंगोटी न करता १०५ वर्षे सण साजरा..
- १९१४ साली गुळवे परिवारात आलेले महालक्ष्मीचे मुखवटे आजही रंगरंगोटी न करता आहे त्या स्थितीत गेली १०५ वर्षे परंपरेने बसवून महालक्ष्मी सण साजरा केला जात आहे.