शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

सावरकर जयंती विशेष; स्वातंत्र्यवीरांच्या सोलापूर जिल्ह्यातील पाऊलखुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 12:22 IST

सावरकरांची सोलापुरात हत्तीवरून मिरवणूक निघाली..काँग्रेसजनांनी केली होती जोरदार निदर्शन

ठळक मुद्देसावरकर जयंतीच्या पूर्वसंध्येला येथील सावरकरप्रेमी विश्वनाथ बेंद्रे यांच्याकडून ‘सावरकर आणि सोलापूरकर’ या विषयी जाणून घेतलेनवीपेठ ते टिळक चौक या मार्गावरून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली

रवींद्र देशमुख 

सोलापूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे देशभक्तीची प्रेरणा..जातीअंताच्या संघर्षातील एक नेतृत्व..प्रतिभावंत साहित्यिक, नाटककार अन् कवी...सावरकरांचं साºया देशावर गारुड होतं. सोलापुरातही सावरकरभक्तांची संख्या हजारोंनी होती. अवघ्या देशाला जाज्वल्य हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित करणाºया सावरकरांचा सोलापुरात सत्कार व्हावा, या उद्देशाने त्यांना आमंत्रित करण्यात आले... ८ आॅगस्ट १९३७ या दिवशी सारे शहर सावरकरमय झाले होते...नवीपेठ ते टिळक चौक या मार्गावरून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली...काँग्रेस जनांचा मात्र या थोर देशभक्ताला विरोध होता...सावरकरांवर अगदी पादत्राणे अन् घाण पाणीही फेकण्यात आले...याकडे दुर्लक्ष करून धीरगंभीर सावरकरांनी टिळक चौकातील सभेत सोलापूरकरांना मार्गदर्शन केले.

सावरकर जयंतीच्या पूर्वसंध्येला येथील सावरकरप्रेमी विश्वनाथ बेंद्रे यांच्याकडून ‘सावरकर आणि सोलापूरकर’ या विषयी जाणून घेतले. त्यावेळी बेंद्रे यांनी महान नेत्याच्या पाऊलखुणा निदर्शनास आणून दिल्या. रामभाऊ राजवाडे यांच्या ‘कर्मयोगी’ वर्तमानपत्राचा आधार घेऊन सांगितले की, अंदमानातील सुटकेनंतर सावरकरांनी रत्नागिरीच्या स्थानबध्दतेत हिंदू समाज संघटित आणि एकजीव करण्याचे कार्य हाती घेतले. जातीव्यवस्था आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेला विरोध केला. आंतरजातीय विवाह लावून दिले आणि महत्त्वाचे म्हणजे ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. त्यांच्या देश आणि समाजासाठीच्या एकूणच कार्यावर प्रभावित होऊन त्यांचा सोलापुरात सत्कार व्हावा, असा शेठ माणिकचंद हिराचंद आणि शेठ वालचंद हिराचंद यांचा मानस होता. त्यानुसार त्यांनी सावरकरांना आमंत्रित केले. त्यानुसार ८ आॅगस्ट १९३७ रोजी स्वातंत्र्यवीर सोलापुरात आले.

सावरकरांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली, असे ‘कर्मयोगी’ वृत्तपत्रात नमूद असून, याचा संदर्भ घेऊन बेंद्रे म्हणाले की, काँग्रेस जनांचा सावरकरांना तीव्र विरोध होता. मिरवणूक सुरू असताना काँग्रेसच्या तत्कालीन ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी सावरकरांवर पादत्राणे आणि घाण पाणी फेकले अगदी दगडफेकही करण्यात आली. सावरकर मात्र धीरगंभीर होते. त्यांनी काँग्रेसच्या निदर्शनांकडे पूर्ण दुर्लक्ष केले. मिरवणूक टिळक चौकात विसर्जित झाली. तेथे सावरकरांची भव्य सभा झाली. तत्पूर्वी ज्येष्ठ काँग्रेस नेते डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर आणि अन्य नेत्यांच्या स्वाक्षरीचे पत्रक काढून या घटनेबद्दल खेद व्यक्त करण्यात आला होता.. असे बेंद्रे म्हणाले.

सावरकरांना थैली दिली- टिळक चौकातील सभेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना सोलापूरकरांनी ६०१ रूपयांची थैली दिली. या सभेस ७००० सोलापूरकर उपस्थित होते. त्यावेळी सावरकरांनी देशातील जातीभेद नष्ट झाला पाहिजे, असे स्पष्ट करून हिंदुस्थानची संकल्पना मांडली.

बार्शी, पंढरपूरचा दौरा- सोलापुरातील दौरा आटोपून सावरकर १० आॅगस्ट रोजी बार्शीला गेले. तेथेही त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळीही सोलापूरसारखी निदर्शने झाली. बार्शीत त्या दिवशी सायंकाळी स्वातंत्र्यवीरांची सभा झाली होती. यावेळी ४००० बार्शीकर उपस्थित होते. त्यांनी सावरकरांचा १०१ रुपयांची थैली देऊन सत्कार केला होता. बार्शीत सावरकरांच्या खुनाचा कटही रचण्यात आला होता; पण मारेकºयाने सावरकरांना पाहिल्यानंतर तो त्यांच्यापुढे नतमस्तक झाला. या मारेकºयाने सावरकरांसमवेत अंदमानात शिक्षा भोगली होती. कुणाला मारायचे हे नाव न सांगता त्याला सुपारी देण्यात आली होती; पण जेव्हा त्याने सावरकरांना पाहिले तेव्हा त्याने शस्त्र खाली टाकल्याची  घटनाही बेंद्रे यांनी सांगितली. सावरकर जून १९३७ पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी अस्पृश्यांसमवेत रात्रीचे भोजन घेतले होते, ही आठवण बेंद्रे यांनी सांगितली.

टॅग्स :SolapurसोलापूरVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर