सोलापुरातील महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची मुंबईला बदली
By Appasaheb.patil | Updated: July 1, 2023 16:32 IST2023-07-01T16:32:06+5:302023-07-01T16:32:20+5:30
महावितरणचे सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची मंत्रालय, मुंबई समन्वयकपदी बदली झाली आहे.

सोलापुरातील महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची मुंबईला बदली
सोलापूर : महावितरणचे सोलापूर जिल्ह्याचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची मंत्रालय, मुंबई समन्वयकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली नाही. दरम्यान प्रभारी अधिकारी म्हणून शिंदे यांच्याकडे चार्ज देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
याप्रसंगी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांनी दीड वर्षापूर्वी सोलापूर अधीक्षक अभियंता पदाची सुत्रे हाती घेतली होती. त्यांनी दीड वर्षाच्या काळात कृषी धोरण अंतर्गत शेतीपंपाची वसूली, १८००० शेती पंप कनेक्शन, घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक थकबाकी वसुली यात पुणे विभागात चांगली कामगिरी करून प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच आषाढी एकादशी यात्रा कालावधीत विनासायास, विनाअपघात आषाढी एकादशी पार पडली.
महावितरण सोलापूर मंडळ अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांची मंत्रालय, मुंबई येथे समन्वयक पदी पदस्थापना झाल्यामुळे विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन ( १०२९ ) च्या वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे सोलापूर मंडळ ( सर्कल ) अध्यक्ष सुनील काळे, सचिव सतीश पाटील, तानाजी चटके, शुकुर शेख, विजयकुमार भावी, संजयकुमार स्वामी, दीपक ताटे, बळीराम कदम, शब्बीरअली पटेल, एम. एम. करजगीकर आदी उपस्थित होते.