बोरेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी संगीता औरसंगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST2021-02-20T05:00:41+5:302021-02-20T05:00:41+5:30

ब-हाणपूर : अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी संगीता बसवंत औरसंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच आमोगसिदध खांडेकर यांनी ...

Sangeeta Aur Sange as Boregaon Gram Panchayat Sub-Panchpadi | बोरेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी संगीता औरसंगे

बोरेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी संगीता औरसंगे

ब-हाणपूर : अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी संगीता बसवंत औरसंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच आमोगसिदध खांडेकर यांनी राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. उपसरपंच पदासाठी संगीता औरसंगे यांचा एकमेव अर्ज आला होता. बोरेगाव ग्रामपंचायत इतिहासात प्रथमच उपसरपंचपदी महिलेला मान मिळाला आहे. यावेळी सरपंच उमाकांत गाडवे, ग्रामपंचायत सदस्य अमोगसिदध खांडेकर, दुल्हेसाब हवालदार, अक्षय माने, ललिता जडगे, लक्ष्मण औरसंगे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक नागनाथ सोरेगाव यांनी काम पाहिले. निवडीनंतर नुतन उपसरपंच संगिता औरसंगे यांचा सरपंच उमाकांत गाडवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

---

फोटो : १८ बोरेगाव

बोरेगांव ग्रामपंचायत उपसरपंचपदी संगीता औरंगे यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करताना सरपंच उमाकांत गाढवे

2 Attachments

Web Title: Sangeeta Aur Sange as Boregaon Gram Panchayat Sub-Panchpadi