वाळू माफियांचा मंडलाधिकाऱ्यासह तलाठ्यावर हल्ला; सांगोला तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:44 PM2020-06-06T20:44:54+5:302020-06-06T20:47:12+5:30

अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Sand mafia attacks on Talatha with Mandaladhikari; Incidents in Sangola taluka | वाळू माफियांचा मंडलाधिकाऱ्यासह तलाठ्यावर हल्ला; सांगोला तालुक्यातील घटना

वाळू माफियांचा मंडलाधिकाऱ्यासह तलाठ्यावर हल्ला; सांगोला तालुक्यातील घटना

googlenewsNext
ठळक मुद्देशनिवारी पहाटेच्या सुमारास घडली घटनासात जणांविरुद्ध सांगोल्यात गुन्हा दाखलअवैध वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त

सांगोला :  अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत असताना दोन वाहनांतून आलेल्या ७ वाळू माफियांनी अचानक हल्ला करून हाताने लाथाबुक्यानी व काठीने जबर मारहाण केली. यात मंडलाधिकारीसह तलाठी असे दोघेजण जखमी झाले. ही घटना शनिवार ६ जून रोजी पहाटेच्या सुमारास कोळा (इराचीवाडी) ता. सांगोला येथे घडली. 

याबाबत, कोळा मंडलाधिकारी नितीन जाधव यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कृष्णा हरी गडदे (रा. गौडवाडी ता. सांगोला), अक्षय पूर्ण नाव माहीत नाही, अल्ताफ मुबारक आतार (रा. कोळा ता. सांगोला), शिवाजी कोळेकर व उमेश कोळेकर (रा. आरेवाडी ता. कवठेमंकाळ जि. सांगली) यांच्यासह अन्य दोघे अशा ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तहसीलदार योगेश खरमाटे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कोळा मंडलाधिकारी नितीन जाधव व तलाठी काटकर असे दोघेजण मिळून कोळा हद्दीतील महादेव आलदर याच्या घराजवळ अवैध वाळू वाहतूक करणारे वाहनांवर कारवाई करण्याचे शासकीय काम करीत असताना बिगर नंबरच्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो व इनोव्हा कारमधून आलेल्या ७ जणांनी मंडलाधिकारी नितीन जाधव यांच्यावर अचानक हल्ला करून शिवाजी कोळेकर याने त्यांना काठीने व त्याच्या सोबत इतर लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केले.  यावेळी त्यांना वाचविण्यासाठी पुढे आलेले तलाठी काटकर यांनाही शिवाजी कोळेकर याने डोक्यात काठीने मारहाण करून जखमी केले.  सदर घटनेनंतर सर्वजण दोन्ही वाहनां
तून पसार झाले. तपास पोलीस उपनिरिक्षक प्रशांत वसगडे करीत आहेत. 

Web Title: Sand mafia attacks on Talatha with Mandaladhikari; Incidents in Sangola taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.