घाटणे हद्दीत केला साडेचार लाखांच्या वाळूचा साठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:22 IST2021-05-14T04:22:22+5:302021-05-14T04:22:22+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीना नदीच्या पात्रालगत घाटणे व मोहोळ शिवारातील सीमेवर वाळूसाठा करून ठेवल्याची माहिती पोलीस ...

Sand deposits of Rs | घाटणे हद्दीत केला साडेचार लाखांच्या वाळूचा साठा

घाटणे हद्दीत केला साडेचार लाखांच्या वाळूचा साठा

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सीना नदीच्या पात्रालगत घाटणे व मोहोळ शिवारातील सीमेवर वाळूसाठा करून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना मिळाली. त्यांनी हवालदार कदम, पोलीस नाईक शरद ढावरे यांच्या पथकास सूचना दिल्याने पथकाने धाड टाकली. यात ४५ ब्रास वाळूसाठा असल्याचे दिसून आले. अधिक चौकशी करता ही वाळू सुदर्शन गायकवाड (रा. मोहोळ) व त्याच्या साथीदारांनी सीना नदीच्या पात्रातून काढून साठा केल्याचे समोर आले. त्याचे बाजारमूल्य ४ लाख ५० हजार असून, या प्रकरणी पोलीस हरिदास थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुदर्शन गायकवाड व त्याच्या साथीदारांच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार मालती नांगरे करीत आहेत.

Web Title: Sand deposits of Rs