शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शाहरुख खानाच्या 'जवान'मधील डायलॉगमुळे ट्रोल होत आहात, असे विचारताच समीर वानखेडे भडकले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 19:06 IST

सचिन कांबळे - पंढरपूर : जवान’ या चित्रपटात शाहरुख खानचा एक डायलॉग आहे. त्यात तो म्हणतो, “बेटे को हाथ ...

सचिन कांबळे -पंढरपूर : जवान’ या चित्रपटात शाहरुख खानचा एक डायलॉग आहे. त्यात तो म्हणतो, “बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर.” शाहरुखचा हाच डायलॉग सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांकडून ट्रोल होत असल्यासंदर्भात विचारले असता नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे भडकले आणि त्यांनी, ते कोण आहेत? मी कुणालाही घाबरत नाही. विठ्ठलाचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे, असे म्हटले आहे.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी वानखेडे हे सप्तनीक पंढरपूर येथे आले होते. या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ॲड. किर्तीपाल सर्वगोड, विशाल मांदळे, रुपेश वाघमारे उपस्थित होते.

ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यनला अटक केली होती. यामुळे डायलॉगद्वारे शाहरुखने समीर वानखेडे यांना टोला लगावल्याचं म्हटलं जात आहे. त्यावर वानखेडे यांना विचारल्यावर त्यांनी संतप्त प्रतिक्रया दिली. 

पुढे ते म्हणाले, मी केस संदर्भात काही सांगू शकत नाही. परंतु आपली न्यायप्रणाली खूप भक्कम व चांगली आहे,  माझा न्यायप्रणालीवर पूर्ण विश्वास आहे. लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केले आहे. त्याचबरोबर माझ्यावर विठ्ठलाचा आशीर्वाद असून तो राहणारच आहे. मी जनतेचा सेवक आहे. जी मला संधी मिळेल त्यातून मी सेवा करणार आहे.  

- नशा मुक्त अभियानावर अधिक लक्ष -

सध्याची परिस्थिती पंतप्रधान व गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली नशा मुक्त अभियानावर अधिक लक्ष दिले जात असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

निवडणूक लढवण्यासंदर्भात बोलणे टाळले -सध्या आपण सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा आहे. हे करे आहे का असे त्यांना विचारल्यास त्यांनी मी काहीच बोलू शकत नाही. मी कायद्याचा माणूस आहे. मी जनतेचा सेवक आहे, आज पर्यंत मी लोकांची सेवा केली आहे. आणि यापुढेही मी लोकांची सेवाच करणार आहे. असे सांगून समीर वानखेडे यांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात बोलणे टाळले. 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेPandharpurपंढरपूरShahrukh Khanशाहरुख खानjawan movieजवान चित्रपट