सॅल्यूट;  कोरोनामुक्त झाल्या...विश्रांतीला फाटा; पोलीस अधीक्षकांचा बंदोबस्तात वाटा...!

By Appasaheb.patil | Published: April 15, 2021 06:05 PM2021-04-15T18:05:52+5:302021-04-15T18:07:19+5:30

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक अन् कडक संचारबंदीचे आव्हान

Salute; Freed from corona ... split to rest; Superintendent of Police's share in security ...! | सॅल्यूट;  कोरोनामुक्त झाल्या...विश्रांतीला फाटा; पोलीस अधीक्षकांचा बंदोबस्तात वाटा...!

सॅल्यूट;  कोरोनामुक्त झाल्या...विश्रांतीला फाटा; पोलीस अधीक्षकांचा बंदोबस्तात वाटा...!

googlenewsNext

सोलापूर - सोलापूरच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते... २० फेब्रुवारीला लस घेतली...बंदोबस्त, नाकाबंदी, निवडणूक कामातून संसर्ग झाला...५ एप्रिलला कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली...सोशल मीडियावर संपर्कातील लोकांना काळजी घेण्याचा संदेश शेअर केला अन् १० दिवसांच्या उपचारानंतर त्या पुन्हा बंदोबस्ताच्या कामात हजर राहणार...पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक अन् कडक संचारबंदीमधील बंदोबस्ताचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे.

अल्पावधीत सोलापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी काम केले. लॉकडाऊन, बैठका, बंदोबस्त, पाहणी, निवडणुका आदी कारणांमुळे त्यांना संसर्ग झाल्याने ५ एप्रिल रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेऊन घरीच क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा संदेश त्यांनी सोशल मीडियावर शेअर करून संपर्कातील लोकांनी काळजी घेण्याचे आवाहनही केले होते.

क्वारंटाइन काळात सातपुते यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला, जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ऑनलाइन मीटिंगद्वारे मार्गदर्शन केले, शिवाय विविध घटनांचा तपास कशा पद्धतीने करावयाचा याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

वाचन करून आवडते चित्रपट पाहिले...

कोरोनाकाळात उपचार घेत असताना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते या घरीच क्वारंटाइन झाल्या होत्या. क्वारंटाइनच्या दहा दिवसांत काय केले याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, क्वारंटाइन काळात डॉ. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वेळेवर औषधोपचार केला. शिवाय वेळ घालविण्यासाठी आवडत्या पुस्तकांचे वाचन करून आवडते चित्रपट पाहिल्याचे त्यांनी सांगितले.

----------

वर्क फ्रॉम होमद्वारे ठेवले कामकाजावर लक्ष

कोरोनाकाळात घरीच क्वारंटाइन असताना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वर्क फ्रॉम होमद्वारे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यासह पोलीस अधीक्षक कार्यालयातील घटना, घडामोडींवर लक्ष ठेवले होते. पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांना फील्डवर राहावे लागत होते. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय, महत्त्वांच्या फायलींवर सातपुते यांनीच सह्या केल्या. यावेळी कोरोनाविषयक सर्व नियमांची काळजी घेतल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.

१५ एप्रिलला माझा १० दिवसांचा कोरोना उपचाराचा कालावधी संपणार आहे. नियमित औषधोपचार, भरपूर आराम केल्याने मी कोरोना आजारातून लवकर बरी झाले. १६ एप्रिलपासून पुन्हा जॉइन होणार असून, शक्य तेवढी काळजी घेऊन पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक बंदोबस्त अन् कडक संचारबंदीमधील बंदोबस्तावर लक्ष असणार आहे.

- तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

Web Title: Salute; Freed from corona ... split to rest; Superintendent of Police's share in security ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.