शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

'त्या' हत्याकांडाला वर्ष पूर्ण; पण कुटुंबीय मदतीपासून वंचितच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 08:10 IST

आठवडे बाजारात सोशल मीडियावर मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरली होती.

- विलास मासाळमंगळवेढा (जि़ सोलापूर) : साहेब, चार पैशानं पोट भरतं का ओ, शासनानं हाताला काम द्यावं, आम्हाला अजूनही रेशनकार्ड नाही, कोणतेही दाखले मिळत नाहीत, असे सांगत धुळे जिल्ह्यातील राईनपाडा हत्याकांडातील घटनेच्या आठवणीने भटक्या विमुक्त जमातीतील नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पीडित नातेवाईकांना गहिवरून आले अन् त्यांनी आक्रोश सुरू केला. आठवडे बाजारात सोशल मीडियावर मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा पसरली होती. त्यातून हे सामूहिक हत्याकांड झाले.मंगळवेढा तालुक्यातील खवे व मानेवाडी येथील भारत भोसले, दादाराव भोसले, भारत माळवे, अगनू इंगोले व राजू भोसले हे पाच जण १ जुलै २०१८ रोजी राईनपाडा (ता़ साक्री, जि. धुळे) येथे भिक्षा मागण्यासाठी गेले असताना लहान मुलांना पळवून नेणारी टोळी समजून ग्रामस्थांनी त्यांना अमानुषपणे मारहाण केली़ त्यात पाच जणांचा मृत्यू झाला़ शासनाने मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली. शिवाय मृतांच्या कुटुंबातील प्रत्येकी एकाला नोकरीत समावून घेतले जाईल. कुटुंबाचे पुनर्वसन केले जाईल. शेतजमीन देण्यात येईल, अशी घोषणा शासनाने केली होती. पण त्यांच्या पदरी काहीच मिळाले नसल्याची खंत वारसदार नर्मदा भोसले, संगीता भोसले, शांता माळवे यांनी व्यक्त केली.वर्ष उलटूनही अद्याप आठ जण फरारचधुळे : राईनपाडा गावात आजही तणावाची स्थिती आहे़ संशयित २८ जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून ८ फरार संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मंगळवेढा तालुक्यातील चार आणि कर्नाटक राज्यातील एक अशा पाच जणांची हत्या करण्यात आली. घटनेनंतर राईनपाडा आणि परिसरातील ग्रामस्थ, तरुण फरार झाले होते. येथील आठवडे बाजार मात्र अजून सुरू झालेला नाही़रेशनकार्ड मिळाले नाहीमृतांचे नातेवाईक शांता माळवे, दिगंबर माळवे, नर्मदा भोसले, सुनील भोसले, लक्ष्मण भोसले, मारूती भोसले, शहानूर फकीर यांची अवस्था फारच बिकट आहे़ घटनेनंतर अनेक राजकीय पुढारी, नेत्यांनी आश्वासने दिली़ मात्र वर्षभरात साधे रेशन कार्डही मिळाले नाही़ जातीच्या दाखल्यासह अन्य दाखलेही मिळेनात़ रोजगारासाठी सर्वांना भटकंती करावी लागत आहे़, असे कुटुंबीयांनी सांगितले.देवानं नव्हं दुष्ट लोकांनी मारलं...शासनाच्या पैशापेक्षा आयुष्यभर साथ देणारा जोडीदार गेला़ आमच्या यांना देवानं नव्हं तर दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी मारलं़ त्यांच्याशिवाय आमचं जीवन पूर्ण होत नाही़ शासनानं आयुष्यभर पैसा दिला तरी मानसिक समाधान होत नाही़ आमची अनेक वर्षांपासून परवड सुरू आहे़ आता तर त्यात जास्तच भर पडल्याचे सीताबाई माळवे सांगत होत्या़ त्यांच्या डोळ््यात पाणी आलं होतं.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये़ कायदा हातात घेण्याचा कोणीही प्रयत्न करु नये़ राईनपाडासह परिसरात जनजागृती करण्यात आली आहे़ २८ संशयितांना जेरबंद केले आहे़ सरकारी वकील म्हणून अ‍ॅड़ उज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे़ - विश्वास पांढरे, पोलीस अधीक्षक, धुळे

टॅग्स :Solapurसोलापूर