कांदलगावच्या सरपंचपदी रोहिणी नवले बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:42 IST2021-02-28T04:42:13+5:302021-02-28T04:42:13+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीत सुधाकर फुरडे, उमाकांत करडे, अरुण नवले, दत्तात्रय नवले यांच्या नेतृत्वाखालील लक्ष्मी-नृसिंह ग्रामविकास आघाडीने सहापैकी चार जागांवर विजय ...

Rohini Navale unopposed as Sarpanch of Kandalgaon | कांदलगावच्या सरपंचपदी रोहिणी नवले बिनविरोध

कांदलगावच्या सरपंचपदी रोहिणी नवले बिनविरोध

ग्रामपंचायत निवडणुकीत सुधाकर फुरडे, उमाकांत करडे, अरुण नवले, दत्तात्रय नवले यांच्या नेतृत्वाखालील लक्ष्मी-नृसिंह ग्रामविकास आघाडीने सहापैकी चार जागांवर विजय मिळवला. याच आघाडीचे दयानंद सरवदे हे बिनविरोध निवडून आले होते़ विरोधी अरुण करडे-गौतम मुकटे गटाचे दोन सदस्य निवडून आले होते. सरपंच व उपसरपंच निवडीवेळी विरोधी गटाचे दोन्ही सदस्य गैरहजर होते़ त्यामुळे सरपंच व उपसरपंच पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडी या बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दयानंद बनसोडे यांनी जाहीर केले़

यावेळी ग्रामपंचायत सदस्य वर्षा फुरडे, कमल कोळी, ग्रामसेवक कपिल थोरात, माजी उपसरपंच कैलास फुरडे, प्रदीप नवले आदी उपस्थित होते़ नूतन पदाधिकाऱ्यांचा सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब फुरडे, संतोष फुरडे, रावसाहेब फुरडे, अरुण नवले, बाबासाहेब सरवदे, शिवाजी नवले, रणजित नवले, अतुल फुरडे, दत्तात्रय नवले, श्रीकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़

फोटो

२७कांदलगाव०१

Web Title: Rohini Navale unopposed as Sarpanch of Kandalgaon