शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचाºयांच्या घरी दरोडा; पाच लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:17 IST

माढ्यातील घटना; चाकूचा धाक दाखवून १६ तोळे सोने व रोख रक्कम लंपास

ठळक मुद्देपोलिसांनी तातडीने श्वान पथक व फिंगर प्रिंट तज्ञांना पाचारण केलेश्वान पथक सध्या दरोडेखोरांचा मागोवा घेत आहेपोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले

माढा : माढ्यातील दोन ते तीन ठिकाणी धाडसी दरोडा टाकून पाच ते साडेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना बुधवारी पाहटे घडली आहे.

विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे  राहणाºया कुमार चवरे व कुर्डूवाडी रोड लगतच्या मिठू वाघ यांच्या घरी बुधवारी अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून सोने चोरून नेले आहे. यामध्ये  १६ तोळे सोने व रोख रक्कम असा ऐवज दरोडेखोरांनी चोरून नेला आहे. तर या ठिकाणी पोलिस उपअधीक्षक डॉ़ सिध्देश्वर भोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

शहरातील कुमार चवरे यांच्या घराची कडी काढून घरामध्ये चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी बुधवारी पहाटे  चाकूचा धाक दाखवून सोने चोरून नेले. यावेळी दरोडेखोरांनी घरातील राधिका चवरे यांना मारहाण केली असून यात महिला जखमी झाली आहे. मिठू वाघ यांच्या कुर्डुवाडी रस्त्यावरील रोकडोबा मंदिराशेजारील घरातील रोख रक्कम व अंदाजे दोन तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले आहे. तर सराफ गल्लीमध्ये चोरी झाली आहे. याबाबत माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून चोरीस गेलेले सोने व रोख याबाबत नेमकी माहिती पोलिस घेत आहेत.

पोलिसांनी तातडीने श्वान पथक व फिंगर प्रिंट तज्ञांना पाचारण केले आहे. श्वान पथक सध्या दरोडेखोरांचा मागोवा घेत आहे. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. मागील काही महिन्यांपासून माढयात चोºया व दरोडयांचे सत्र वाढले आहे. परिसरात अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांत भितीचे वातावरण आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरmadha-acमाढाThiefचोरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस