शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

संचारबंदी काळात सोलापूर जिल्ह्यातील रस्ते वाहतूक बंद; अत्यावश्यक सेवेसाठी पर्यायी रस्ते

By appasaheb.patil | Updated: August 4, 2020 11:53 IST

राज्यसरहद्दीवरील १७८ रस्तेही केले बंद; अत्यावश्यक सेवेसाठी पर्यायी रस्ते चालू

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा यांच्यासाठी ३१ पर्यायी रस्ते चालू राज्यसरहद्दीवरील २०९ रस्त्यापैकी १७८ रस्ते बंद राहतीलअक्कलकोट विभागातील आंतरजिल्हा व आंतरराज्य सिमा बंद राहतील

सोलापूर : सोलापूर शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व संसर्ग पाहता ३१ आॅगस्ट २०२० पर्यंत संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. या काळात सोलापूर ग्रामीण भागातील शहराला जोडून ९ तर  आंतरजिल्हा व आंतरराज्य सरहद्दी वरील १७८गावातील रस्ते वाहतूक बंद करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.

ग्रामीण भागात संचारबंदी परिणामकारक होण्यासाठी, सोलापूर शहरातील लोक ग्रामणी भागात जावून कोरोना संसर्ग वाढवू नयेत, बाहेरून लोकांचे आगमन आणि निर्गमन होऊ नये, यासाठी गावाला जोडणारे रस्ते बंद करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक, वैद्यकीय सेवा, शासनाने परवानगी दिलेल्या सर्व सेवासुविधा पुरवविणाºया आस्थापनांचे वाहतुकीच्या वाहनांकरीता पयार्यी मार्ग वाहतुकीसाठी सुरु राहतील असे पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे. 

अक्कलकोट विभागातील आंतरजिल्हा व आंतरराज्य सिमा बंद राहतील. ग्रामीण भागात सोलापूर,बार्शी, करमाळा उपविभाग (माढा तालुका), करमाळा तालुका, अकलूज, मंगळवेढा विभाग (सांगोला तालुका), मंगळवेढा तालुका या भागातील राज्यसरहद्दीवरील २०९ रस्त्यापैकी १७८ रस्ते बंद राहतील. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा यांच्यासाठी ३१ पर्यायी रस्ते चालू राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.------------शहरानजीकचे बंद करण्यात आलेले रस्ते...

  • हिरज ते विद्यापीठजवळ पुणे हायवे रोडला मिळणारा रस्ता
  • तिºहे ते शिवणी
  • केगांव ते खेड अंतर्गत रस्ता
  • हगलुर ते दहिटणे
  • पाथरी ते बेलाटी रस्ता
  • सोरेगांव ते डोणगांव ते नंदूर
  • सोरेगांव ते समशापूर
  • सोरेगांव ते डोणगांव ते तेलगांव
  • विडी घरकुल कुंभारी ते विजयनगर मार्गे सोलापूर

--------------पर्यायी रस्ते..........

  • समशापूर ते हत्तूर
  • नंदुर ते सोरेगांव
  • पाथरी ते तिºहे
  • तिºहे ते सोलापूर
  • शिवणी ते हिरज
  • खेड ते बाळे
  • हगलूर ते तुळजापूर रोड
  • तेलगांव ते पाथरी
  • क्रांती चौक ते मेनरोड (सोलापूर अक्कलकोट)
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसcorona virusकोरोना वायरस बातम्याroad transportरस्ते वाहतूक