शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या पाण्याने ओढे, नाले, तलाव, बंधारे भरुन घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 20:14 IST

सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांचा ‘लोकमत’ शी संवाद

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत आहेजनी धरण 96% भरले असून वरुन पाण्याचा प्रवाह वाढतच आहेबोगद्यातून सोडलेले पाणी सीना नदीकाठच्या शेतीसाठी उपयोगी पडणार

सोलापूर : उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने कालवा व उपसा सिंचन योजनांद्वारे जिल्ह्यातील तलाव, खोलीकरण केलेले ओढे, बंधारे भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी कालवा व दोन्ही नद्यांना पाणी सोडण्यात आले असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी ‘लोकमत’ बोलताना सांगितले. 

पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग उजनी धरणात येत आहे. यामुळे उजनी धरण सोमवारी सायंकाळी ७५ टक्के भरले असून वरुन पाण्याचा प्रवाह वाढतच आहे. यामुळे उजनीचे दरवाजे उघडून भीमा नदीला पाणी सोडले आहे. याशिवाय कालवा व भीमा-सीना बोगद्यालाही पाणी सोडण्यात आले आहे. बोगद्यातून सोडलेले पाणी सीना नदीकाठच्या शेतीसाठी उपयोगी पडणार आहे कारण जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने पाण्याची गरज आहे. सीना नदीवरील बार्शी व शिरापूर या उपसा सिंचन योजनाही कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बार्शी व उत्तर तालुक्यातील योजनेच्या कार्यक्षेत्रातील तलावात पाणी सोडण्यास मदत होणार आहे.

कालव्यातून सोडलेले पाणी उजव्या व डाव्या कालव्याद्वारे सोलापूर शहरापर्यंत येणार आहे. धरणापासून सोलापूरपर्यंत कालव्यालगतच्या ओढ्यांना, ओढ्यावरील बंधाºयांना व तलावात पाणी सोडता येणार आहे.  तसे आदेश असल्याचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले.  ज्या-ज्या ठिकाणी पाणी साठवता येणार आहे त्या-त्या ठिकाणी पाणी सोडण्यासाठीच्या सूचना आम्ही कर्मचाºयांना दिल्या असल्याचे साळे यांनी सांगितले. 

त्या अन् याही वर्षी सारखीच स्थिती..- २०१३ मध्ये अशाच पद्धतीने पुणे जिल्ह्यात पाऊस पडल्याने उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत होते.  त्यावर्षीही जिल्ह्यात पाऊस कमी पडल्याने उजनी धरण कालवा क्षेत्राखालील तलाव, ओढे, नाले, बंधारे पाण्याने भरुन घेतले होते. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाºयांनी पाण्याचे नियोजन केल्याने अनेक कोरडे तलाव पाण्याचे भरुन निघाले होते. ही परिस्थिती याही वर्षी निर्माण झाली असून उजनीमुळे मागील वर्षीही जेमतेम तलाव भरले होते.  

- सीना-माढा उपसा सिंचन योजना सुरू करण्यात आली असून मंगळवारी दहिगाव उपसा सिंचन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. बार्शी व शिरापूर उपसा सिंचन योजनाही सुरू केल्या जाणार असल्याचे कार्यकारी अभियंता रमेश वाडकर यांनी सांगितले. 

उजनीत पुणे जिल्ह्यातून येणारा पाण्याचा विसर्ग पाहता कालवा क्षेत्रात ज्या-ज्या ठिकाणी पाणी साठवता येईल त्या-त्या ठिकाणी पाणी साठवले जाईल.  तसे नियोजन केले असून किमान महिनाभर कालवा व बोगद्याला पाणी सोडण्याचे नियोजन आहे. शेतकºयांनीही पाणी साठविण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करावेत.- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूक