बाजार समितीत लवकरच शेतक-यांना मतदानाचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 04:42 AM2017-12-26T04:42:01+5:302017-12-26T04:42:05+5:30

सोलापूर : हिवाळी अधिवेशनात बाजार समितीमध्ये शेतक-यांना मतदानाचा अधिकार देणारे विधेयक दोन्ही सभागृहात पारीत झाल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी येथे दिली.

The right to vote for farmers in the market committee soon | बाजार समितीत लवकरच शेतक-यांना मतदानाचा अधिकार

बाजार समितीत लवकरच शेतक-यांना मतदानाचा अधिकार

Next

सोलापूर : हिवाळी अधिवेशनात बाजार समितीमध्ये शेतक-यांना मतदानाचा अधिकार देणारे विधेयक दोन्ही सभागृहात पारीत झाल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सोमवारी येथे दिली. या कायद्यानुसार निवडणुका घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभेत यापूर्वी दोन वेळा विधेयक पारीत झाले; पण विधान परिषदेत बहुमत नसल्याने ते रखडले होते. हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांनी त्याला मान्यता दिली. जुनी निवडणूक पद्धत कायम ठेवण्याची मागणी करणाºया हरकती दाखल झाल्या होत्या; मात्र त्यात तथ्य नाही, अशी सरकारने ठाम भूमिका घेतली. मतदारांचे निकष, अटी - नियम निश्चित होत आहेत. मतदार याद्या, मतदान प्रक्रिया आदी कामे मार्गी लागत आहेत. लवकरच नव्या कायद्याने निवडणुका होतील, हे या अधिवेशनातील फलित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फळे व भाजीपाल्याचे काढणी पश्चात होणारे नुकसान टाळण्यासाठी कार्यकारी संचालक, महाराष्टÑ राज्य कृषी पणन मंडळाच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती नियुक्त केली आहे. ही समिती विविध उपाययोजना सूचविणार आहे.
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कृषी क्रांतीचे अंकुश पडवळे (मंगळवेढा) यांचा समितीमध्ये समावेश आहे. एक महिन्यात समिती शासनाला अहवाल देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
>सुनावणीचे अधिकार सचिवांना
शासन स्तरावरील अपिलांची सुनावणी घेण्याचे अधिकार सचिव दर्जाच्या अधिकाºयांना प्रदान करण्याचा कायदा आणि त्यातील सुधारणा सहकार खात्याने मंजूर केला आहे. मागील दहा वर्षात ११८७ अपिलाची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यातील ८०० प्रकरणे चौदा महिन्यात निकाली काढली, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: The right to vote for farmers in the market committee soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.