दुचाकीस्वाराच्या धडकेने निवृत्त बँक मॅनेजरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:21 IST2021-05-10T04:21:59+5:302021-05-10T04:21:59+5:30

: येथील बँक ऑफ बडोदाचे सेवानिवृत्त मॅनेजर आनंद शिवमूर्ती रजपूत (वय ६८) यांचे अपघाती निधन झाले. आनंद ...

Retired bank manager killed in two-wheeler crash | दुचाकीस्वाराच्या धडकेने निवृत्त बँक मॅनेजरचा मृत्यू

दुचाकीस्वाराच्या धडकेने निवृत्त बँक मॅनेजरचा मृत्यू

: येथील बँक ऑफ बडोदाचे सेवानिवृत्त मॅनेजर आनंद शिवमूर्ती रजपूत (वय ६८) यांचे अपघाती निधन झाले.

आनंद रजपूत हे शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता नेहमीप्रमाणे कुर्डूवाडी ते अकुलगाव रस्त्यावरील एमआयडीसीकडे चालत व्यायामाला गेले होते. ते व्यायाम करून माघारी घराकडे येत असताना अकुलगावकडून कुर्डूवाडीकडे भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीस्वराने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यावेळी ते रस्त्यावर पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. ही घटना कळताच नातेवाइकांनी पुढील उपचारासाठी बार्शी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले; परंतु रविवारी सकाळी त्यांची प्राण ज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर भोसरे येथील के.एन. भिसे कॉलेजच्या पाठीमागील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते माजी सभापती शीला रजपूत यांचे पती होत, तर प्रा. डॉ आशिष रजपूत यांचे वडील होत.

०९आनंद रजपूत-अपघात

Web Title: Retired bank manager killed in two-wheeler crash