भांडण सोडवणं पडलं महागात, रॉडनं वृद्धाचा डोकं फोडलं
By विलास जळकोटकर | Updated: June 27, 2023 14:18 IST2023-06-27T14:18:06+5:302023-06-27T14:18:37+5:30
जखमी सोलापूरचा : कर्नाटकात झाली मारहाण

भांडण सोडवणं पडलं महागात, रॉडनं वृद्धाचा डोकं फोडलं
विलास जळकोटकर, सोलापूर : भांडू नका म्हणून भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या ७० वर्षीय वृद्धाच्या डोक्यात लोखंडी रॉडचा प्रहार करुन डोकं फोडले. हा प्रकार कर्नाटकातील तद्देवाडी (झळकी) ता. इंडी येथे घडला. यामध्ये बाशालाल बडेसाब मुजावर (वय -७०, रा. विजापूर नाका झोपडट्टी नं २) हा वृद्ध जखमी झाला.
यातील जखमी वृद्ध हा मुळचा सोलापूरचा असून, नातलगाकडे तद्देवाडी झळकी या गावी गेला होता. २० जून रोजी त्याच्यासमोर सुरु असलेले भांडण तो बुजूर्ग म्हणून सोडवण्यासाठी गेला असता भांडण करणाऱ्यापैकी एकानं लोखंडी रॉडनं जखमी वृद्धाच्या डोक्यात प्रहार केला. या तो जखमी झाला. त्याच्यावर विजापूर येथील सरकारी दवाखान्यात उपचार करण्यात आले. सोमवारी (२६ जून) सायंकाळी त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पुतण्या हैदर मुजावर याने दाखल केले आहे. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.