शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

५० फूट खोल विहिरीत पडलेल्या मोरास वाचवले; वन्यजीव प्रेमी, वनविभागाची कामगिरी! 

By शीतलकुमार कांबळे | Updated: July 15, 2024 19:28 IST

वनविभागाची कामगिरी; हंजगी गावातील घटना

सोलापूर: हंजगी (ता. अक्कलकोट) येथील एका विहिरीत पडलेल्या मोरास वाचवण्यात आले. ५० फूट खोल असलेल्या विहिरीत वन्यजीवप्रेमी उतरून सुरक्षितरीत्या मोरास बाहेर काढले. मागील दोन दिवसापासून मोर विहिरीतच पडला होता. हंगजी गावातील एका शेतकऱ्याला विहिरीत मोर पडलेला दिसला. याबाबत वनपाल शंकर कुताटे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी वनरक्षक अनिता शिंदे व वनविभाग रेस्क्यू टीम ला कळविले. वनविभाग बवाच टीमचे सदस्य अनिता शिंदे, प्रविण जेऊरे, तेजस म्हेत्रे, वाहन चालक भीमराव राठोड घटनास्थळाकडे रवाना झाले.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी विहिरीचे निरीक्षण केले. मोर पडलेली विहीर ही ४० ते ५० फूट खोल होती. आत मध्ये प्रवेश करण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मोर विहिरीच्या आधी कोपऱ्यात घाबरून बसला होता. त्यामुळे आतमध्ये जाण्याच्या कोणताही पर्याय दिसत नव्हता, अशा वेळी प्रवीण जरूरे हे रॅपलिंग करत पन्नास फूट खोल विहीर उतरले. अत्यंत शीताफिने त्यांनी मोराला पिंजरामध्ये कैद केले. त्यानंतर सुरक्षितरित्या पिंजराला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

गावातील पशुवैद्यकीय दवाखानामध्ये मोराची प्राथमिक  तपासणी केली. त्या मोराला अशक्तपण असल्यामुळे टीटीसी सेंटर सोलापूरमध्ये आणण्यात आले. ही मोहीम सोलापूर वनविभाग सोलापूरचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाने, वनपाल शंकर कुताटे, वनरक्षक अनिता शिंदे, वाहन चालक भीमराव राठोड, वन्यजीव प्रेमी संस्था सदस्य तेजस म्हेत्रे या सदस्यांनी यशस्वी केली.

टॅग्स :Solapurसोलापूर