वळसंगच्या अतुल भोसलेंची बदली; अनिल सनगल्ले नवे प्रभारी
By Appasaheb.patil | Updated: January 24, 2023 16:06 IST2023-01-24T16:06:23+5:302023-01-24T16:06:46+5:30
वळसंग पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल गुरुबसप्पा सनगल्ले यांची नेमणूक करण्यात आली आहे.

वळसंगच्या अतुल भोसलेंची बदली; अनिल सनगल्ले नवे प्रभारी
सोलापूर : प्रशासकीय कारणास्तव पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल श्रीधर भोसले यांची पोलिस कल्याण शाखा येथे बदली केली आहे. दरम्यान, वळसंग पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल गुरुबसप्पा सनगल्ले यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील आस्थापना मंडळाची बैठक २१ जानेवारी २०२३ रोजी झाली. या बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. आस्थापना मंडळाच्या निर्णयानुसार प्रशासकीय कारणास्तव सहायक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अतुल भेासले यांनी वळसंग पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यानंतर विविध उपक्रमातून एक वेगळी ओळख पोलिस ठाण्याची बनविली होती.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भोसले यांनी नागरिकांच्या सहकार्यातून अनेक उपक्रम राबविले होते. दरम्यान, कामती, मंद्रुप, पंढरपूर व अन्य पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी याचा कार्यकाल पूर्ण झाला असून त्यांच्याही बदल्या प्रतिक्षेत असल्याचे सांगण्यात आले. येत्या पुढील काळात पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे हे नवे आदेश काढून अनेक ठाण्यांचे कारभारी बदलतील असेही सांगण्यात आले.