शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरुन बळीराम साठेंना हटवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 12:20 IST

जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत ठराव; दूध संघाच्या निवडीचे पडसाद

ठळक मुद्देकाँग्रेस भवनमध्ये प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक झालीराष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या जिल्'ातील नेत्यांना विश्वासात घेतले नाहीजिल्हा परिषदेच्या राजकारणात काँग्रेसने राष्ट्रवादीला नेहमीच सहकार्य केले

सोलापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्षपद दिलीप माने यांना दिल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बळिराम साठे यांना जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरुन हटवण्यात यावे. या जागी काँग्रेसच्या सदस्याची निवड करावी असे पत्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी झेडपी अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांना पाठवले आहे. 

काँग्रेस भवनमध्ये प्रकाश पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक झाली. कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, अश्फाक बळोरगी, महिला जिल्हाध्यक्ष शाहीन शेख, सांगोला तालुक्याध्यक्ष दीपक पवार, मंगळवेढ्याचे नंदकुमार पवार, मोहोळचे अशोक देशमुख, माढ्याचे सौदागर जाधव, दक्षिण सोलापूरचे हरिश पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना प्रत्येक जिल्ह्यातील निर्णय समन्वयाने घेण्याचा निर्णय झाला. माजी आमदार दिलीप माने यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढविली. सुशीलकुमार शिंदे यांच्याविरोधात विधाने केली. त्या मानेंना राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद दिले. हे करण्यात बळिराम साठे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेसच्या जिल्'ातील नेत्यांना विश्वासात घेतले नाही. जिल्हा परिषदेच्या राजकारणात काँग्रेसने राष्ट्रवादीला नेहमीच सहकार्य केले. आता या बदल्यात राष्ट्रवादीने काँग्रेसला सहकार्य करणे अपेक्षित आहे. झेडपीचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या सदस्याला द्यावे, असे मत काही सदस्यांनी मांडले. कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, अश्फाक बळोरगी यांनीही हाच सूर लावला. हे पत्र झेडपी अध्यक्षांना पाठवण्यात आले. 

पालक सचिव तत्काळ नेमाजिल्हातील काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे व्हावीत यासाठी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एका पालक सचिवाची नेमणूक करावी. यात काँग्रेसचा माणूस असावा. काँग्रेसच्या अनेक पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांना विविध कामांची निवेदने दिली आहेत. या निवेदनांवर तत्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे करावी. उजनी धरण १०० टक्के भरले. जलसंपदा विभागाने हिळ्ळी बंधाºयापर्यंत पाणी सोडण्याचे नियोजन व्हावे. काँग्रेसला याबद्दलची माहिती द्यावी आदी ठरावही मांडण्यात आले.पडद्यामागे काय घडतय?झेडपीचा विरोधी पक्षनेता, पक्षनेता ठरवण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला आहेत. झेडपी अध्यक्ष अनिरुध्द कांबळे हे मोहिते-पाटील गटाचे आहेत. मोहिते-पाटील आणि अजित पवार यांच्यात उघड संघर्ष आहे. मोहिते-पाटलांनी कांबळे यांना इशारा करावा. कांबळे यांनी बळीराम साठे यांना हटवून काँग्रेसच्या सदस्याची विरोधी पक्षनेतेपदी निवड करावी यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी हा डाव टाकला आहे. यावर राष्ट्रवादी काय करते याकडे लक्ष आहे.  ै

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस